sai baba | साई बाबा

sai baba

श्री साईबाबा हे भारतातील आतापर्यंत झालेल्या महान संतांपैकी एक संत असून, अभूतपूर्ण शक्तीने संपन्न व देव अवतार म्हणून त्यांची संपूर्ण भारतभर तसेच भारताबाहेर पूजा केली जाते.साईबाबा एक अवलिया फकीर होते.(sai baba)

अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील शिर्डी या गावात त्यांचे वास्तव्य असल्यामुळे त्यांना “शिर्डीचे साईबाबा” असे म्हणून ओळखले जाते येथूनच साईबाबांनी सर्वांना श्रद्धा व सबूरी हा महामंत्र दिला. त्यामुळे शिर्डी हे भारतासह जगभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे.

sai baba

साईबाबांचे आई वडील जन्मस्थळ किंवा जन्म याविषयी कोणाला काहीही माहिती नाही, साईबाबांना आणि इतरांनाही याविषयी अनेक प्रश्न विचारले असता परंतु याबाबत खात्रीलायक उत्तरे किंवा माहिती अजूनही उपलब्ध नाही.

भक्तांच्या मते श्री साई बाबा एका तरुण मुलाच्या रूपात शिर्डीला एका लिंबाच्या झाडाखाली प्रकट झाले त्यावेळी सुद्धा ते आपल्या ज्ञानाने परिपूर्ण वाटले त्यांना कसल्याही सुखाची किंवा वस्तूची अपेक्षा नव्हती. त्यांच्या आशीर्वादाने कित्येकांच्या समस्या चे निराकरण होईल किंवा आपल्याला मोक्ष मिळे. सर्वांना आशीर्वाद देताना ते फक्त तीन शब्दांचा उल्लेख करत “अल्ला अच्छा करेगा.”(sai baba)

साईबाबांनी कधी प्रवचन दिले नाही किंवा औपचारिक शिकवण सुद्धा दिली नाही त्यांनी तत्त्वज्ञानाचे कोणते पुस्तक सुद्धा लिहिले नाही ते फक्त प्रत्यक्षात आणि स्वतःच्या जीवनातील उदाहरणे सांगून भक्तांना दृष्टांत सांगत असे. भक्तांना त्यांचे ईश्वरी प्रेम आणि वरदान प्रत्यक्षात प्राप्त होत असे, त्यासाठी कोणत्याही मध्यस्थ्याचे आवश्यकता नसत. साईबाबा आपल्या भक्तांच्या अपेक्षा प्रत्यक्षात पूर्ण करत.

शिर्डीत येऊन प्राप्त होणारी मनशांती व मिळणारा आत्मविश्वास यामुळे फक्त हिंदू नव्हे तर सर्व धर्मातील भक्त शिर्डीला मोठ्या भक्तीभावाने येतात व साईंबाबाची प्रार्थना करतात.(sai baba)

संत साईबाबांचे भक्त फक्त भारतात नसून भारताबाहेर मोठ्या प्रमाणात आहे ठिकठिकाणी साईबाबांची मंदिरे उभारण्यात आली असून त्यांच्या भक्तांच्या म्हणण्यानुसार ते फक्त संत नसून ते एक अवतारी पुरुष होते. त्यांना काही लोक दत्तचा अवतार मानतात तर कोणी विष्णूचा तर कोण शिवाचा. 

साईबाबांच्या भक्त समुदायात सर्व जाती धर्माच्या लोकांचा समावेश होतो मुस्लिम धर्मातील सुफी संतांमध्ये संत साईबाबांना मानाचे स्थान आहे(sai baba)

साईबाबांच्या मंदिराचा परिसर सुमारे दोनशे चौरस मीटर मध्ये पसरलेला आहे हा परिसर शिर्डी गावाच्या बरोबर मध्यभागी आहे.

श्री साईबाबांच्या दर्शनासाठी दर्शनासाठी २५००० भाविक शिर्डीला भेट देत असतात सण उत्सवाच्या काळात हाच आकडा दररोज एक लाखापेक्षा जास्त जातो. मंदिर परिसराचे मोठ्या प्रमाणात नूतनीकरण करण्यात आलेले आहे. शिर्डी संस्थानच्या वतीने भाविकाना सर्व सुविधा पुरविल्या जातात.(sai baba)

sai baba 

१५ ऑक्टोंबर १९१८ रोजी साईबाबांनी दसऱ्याच्या दिवशी शिर्डी येथे महासमाधी घेतली आजही बाबांच्या कृपेने अनेक भक्तांना बाबांच्या ईश्वरी प्रेमाचा अनुभव शिर्डी येथे येत असतो त्यामुळे आजही अनेक भक्त शिर्डीला भेट देत असतात.  भक्तांच्या मनोकामना या बाबांपर्यंत निश्चित पोहोचतात व ते त्या पूर्ण करतात त्यामुळे शिर्डीत आल्यानंतर कोणताही भक्त रिकाम्या हाताने परत जात नाही.

शिर्डी जवळील पर्यटन स्थळे:

१) शनिशिंगणापूर: शनिशिंगणापूर हे अहमदनगर जिल्ह्यातील एक प्रमुख धार्मिक स्थळ आहे शनिशिंगणापूर येथे सूर्यपुत्र शनि यांचे प्रसिद्ध मंदिर असून फार मोठ्या प्रमाणात भाविक येथे भेट देत असतात. शनिशिंगणापूरचे वैशिष्ट्य म्हणजे येथील घरांना दरवाजे नाही शनिदेवच आपल्या घरांचे रक्षण करतो अशी येथील लोकांची भावना आहे. शनिशिंगणापूर हे शिर्डी पासून ७०किलोमीटर अंतरावर आहे.(sai baba) 

sai baba

२) काळाराम मंदिर नाशिक: काळाराम मंदिर हे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील एक मंदिर असून नाशिकच्या पंचवटी भागात आहे. हे मंदिर भगवान रामाला समर्पित आहे. जवळच असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरासारखेच या मंदिराचे स्थापत्य आहे हे मंदिर १७९४ मध्ये बांधले गेले होते. मंदिराच्या गर्भगृहात भगवान रामासोबत देवी सीता आणि लक्ष्मण यांच्या मूर्ती देखील आहेत. हजारो भाविक दररोज मंदिरात दर्शनासाठी येत असतात.

३) पांडवलेणी नाशिक: या लेणी नाशिक शहराच्या सीमेवर आहेत एकूण २४ असून बहुतेक गुहांमध्ये भगवान बुद्ध किंवा जैनतीर्थकारांच्या भव्य मूर्ती आहेत. या लेणी सुमारे २००० वर्ष जुन्या आहेत(sai baba)

अशीच नवनवीन माहिती वाचण्यासाठी येथे CLICK करा.

४) रामकुंड: प्रभू श्री रामचंद्र त्यांच्या १४ वर्षाच्या वनवास काळात बराच काळ नाशिकमध्ये राहिले या काळात ते याच ठिकाणी स्नान करत असे मानले जाते म्हणूनच या ठिकाणाला रामकुंड असे म्हणतात दर बारा वर्षांनी येथे कुंभमेळ्याचे आयोजन होते

५) नेवासा अहमदनगर: नेवासा आहे वसलेले एक प्राचीन शहर आहे. संत ज्ञानेश्वरांनी इथेच एका खांबाजवळ ज्ञानेश्वरी लिहिली. येथे प्राचीन मोहिनीराज मंदिर असून हे महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांचे कुलदैवत आहे.

शिर्डीला कसे पोहोचाल: 

१)रस्ते मार्ग: महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस महाराष्ट्रातील प्रमुख शहरे जसे की नाशिक मुंबई पुणे औरंगाबाद कोपरगाव येथून वेळोवेळी शिर्डीला जाण्यासाठी उपलब्ध असतात तसेच विविध राज्यातून पर्यटक भेट देण्यासाठी येत असतात. शिर्डी हे पुणे पासून १८५ किलोमीटर अंतरावर आहे. तर मुंबई पासून २३५ किलोमीटर अंतरावर आहे.(sai baba)

२) रेल्वे मार्ग: शिर्डी येथील साईनगर हे रेल्वे स्टेशन महाराष्ट्र तसेच भारतातील इतर रेल्वे स्थानकांची चांगल्या प्रकारे जोडले गेलेले आहे त्यामुळे येथे जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात रेल्वे उपलब्ध असतात. शिर्डी पासून दुसरी जवळील रेल्वे स्थानक एक मनमाड जंक्शन जे शिर्डी पासून साठ किलोमीटर अंतरावर आहे

३) हवाई मार्ग: शिर्डी येथे विमानतळ असल्यामुळे भारतातील विविध शहरांमधून येथे हवाई मार्गाने जाता येते. शिर्डी विमानतळ हे भारतातील अनेक प्रमुख शहरांशी हवाई मार्गाने जोडलेले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *