Site icon dnyankosh.in

पुणे | places to visit near pune

places to visit near pune

पुणे म्हटलं की फक्त लोणावळा मुळशी खंडाळा सिंहगड एवढेच स्पॉट आहेत का पुण्याजवळ सुद्धा इतके इंटरेस्टिंग स्पॉट आहेत जिथे तुम्ही तुमची डे ट्रिप प्लॅन करू शकता ते ही तुमच्या कुटुंबासहित तर असे कुठले स्पॉट आहेत असे १० बेस्ट युनिक आणि वेगळे स्पॉट या ब्लॉग मध्ये सांगणार आहे.(places to visit near pune)

रामदरा

तर आपलं पहिलं ठिकाण आहे रामदरा पुण्यापासून ३० किलोमीटर अंतरावरती आहे लोणी काळभोर वरून तुम्ही तिथे जाऊ शकता मंदिराकडे जाणारा रस्ता प्रचंड खराब आहे पण तिथे जाणं खूप लाखमोलाचे आहे. या लोकेशन वर तुम्ही जर गेलात ना तर तुम्हाला असं वाटणारच नाही की तुम्ही पुण्याच्या इतके जवळ आहात मस्तपैकी छान तळ आणि तळ्याकाठी असणार हे सुंदर रामाचं आणि शंकराचं मंदिर हे मंदिर रामाचं आणि शंकराचा आहे पण इथे खूप साऱ्या देवदेवतांची आणि संतांची छोटी छोटी शिल्प आहेत. विष्णूचे दहा अवतार इथे रेखाटलेले आहेत. नंदीची मूर्ती सुद्धा खूप सुंदर आहे त्यामुळे हे मंदिर बघण्यातच तुमचे एक ते दोन तास कसे जातील तुम्हाला कळणार नाही मंदिराच्या आजूबाजूचा परिसर सुद्धा खूपच सुंदर असून तो संपूर्ण झाडांमध्ये आहे. मंदिराच्या बाजूनेच छोटीशी पायवाट आहे आणि त्या पायवाटेने तळ्याचा आणि मंदिराचे खूप सुंदर दृश्य  दिसते.(places to visit near pune) सकाळी लवकर गेलात तर खूप वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी सुद्धा तुम्हाला इथे दिसू शकतील सगळ्यात छान गोष्ट म्हणजे वनविभागाने इथे छान सीट आऊट सुद्धा केलेत त्यामुळे फॅमिली सोबत किंवा मित्र-मैत्रिणींसोबत तुम्ही गेला असाल तर तिथे तुम्ही निवांत बसून तुमचा वेळ घालवू शकता इथे जायचं असेल तर शक्यतो सकाळी लवकर जा किंवा संध्याकाळच्या वेळी जा सनसेट सुद्धा इथं तुम्ही एन्जॉय करू शकता एक महत्वाची गोष्ट म्हणजे इथे आजूबाजूला खाण्याची तितकी चांगली व्यवस्था नाहीये छोट्या छोट्या टपऱ्या आहेत आणि तिथे मिळणारे पदार्थ काही इतके चांगले नाहीयेत त्यामुळे शक्यतो बाहेरून खाऊनच तुम्ही मंदिर बघायला जा किंवा मंदिर बघून झाल्यानंतर तुम्ही बाहेर जाऊन कुठेही खाऊ शकता. 

भुलेश्वर

तर आपला पुढचे ठिकाण आहे भुलेश्वर, पुण्यापासून ४५ किलोमीटर च्या अंतरावरती पुणे सोलापूर हायवेच्या जवळ. आता पुरातन मंदिर म्हणलं की आपल्याला पुण्यातलं एकच मंदिर आठवतं ते म्हणजे पाताळेश्वर परंतु हे मंदिरसुद्धा प्रचंड पुरातन आहे म्हणजे असं म्हणतात की बाराव्या किंवा तेराव्या शतकात ते बांधलं गेलं आणि फारच सुंदर मंदिर आहे संपूर्ण डोंगराच्या पठारावरती हे मंदिर बांधलेले आहे त्यामुळे जाणारा रस्ता संपूर्ण घाटातनं जातो बाहेरून बघितल्यावर आपल्याला असं वाटतच नाही की आतमध्ये इतकी शिल्पकला असेल म्हणजे मंदिराच्या आत गेल्यावरती तुम्हाला डायरेक्ट खजुराहो किंवा वेरूळ अशा लेण्यांमध्ये गेल्याचा भास होतो इतकं सुंदर कोरीवू काम इथे केलेले आहे(places to visit near pune) आणि प्रत्येक खांबावरती ते कोरीव काम आहे इथला नंदी सुद्धा खूप सुंदर व वेगळा आहे म्हणजे इतर शंकराच्या मंदिरांमध्ये असतो तसा नाहीये त्याची मान थोडीशी तिरकी आहे आणि ते इतकं रियलिस्टिक आहे की प्रत्यक्ष तिथे नंदीबैल बसलाय असं आपल्याला वाटतं पावसाळ्यासाठी हे ठिकाण उत्तम आहे कारण बरेच लोक तिथे पावसाळ्यात जातात पण उन्हाळ्यात सुद्धा म्हणजे संपूर्ण पाषाणामध्ये बांधलेले हे मंदिरे इतकं सुंदर व्हेंटिलेशन आहे तुम्हाला अजिबात तिथे उकडत नाही त्यामुळे तुम्ही उन्हाळ्यात जरी प्लॅन करत असाल तरी हा स्पॉट बेस्ट आहे.(places to visit near pune) 

बनेश्वर

आपलं तिसरं ठिकाण आहे विशेषतः सगळ्या शाळांचा फेवरेट ठिकाण आणि ते म्हणजे बनेश्वर. पुण्यातल्या सगळ्या प्राथमिक शाळा आणि बालवाड्यांचं ट्रिपचं ठरलेलं ठिकाण म्हणजे बनेश्वर आहे कारण मीच शाळेत असताना तीन किंवा चार वेळा बनेश्वरला जाऊन आलोय पण खरंच लहान मुलांसाठी तर हे ठिकाण जास्त छान आहे. नावाप्रमाणेच बनेश्वर हे ठिकाण पूर्णपणे वनामध्ये वसलेलं आहे. इथे असलेले महादेवाचे मंदिर खूप जुने असून या मंदिराचे बांधकाम नानासाहेब पेशव्यांनी केलेले आहे, मंदिराला लागूनच छोटीशी बाग आहे आणि बागेला लागूनच धबधबा आहे.(places to visit near pune) उन्हाळ्यात धबधबा कोरडा असतो साधारण जुलै नंतर त्याला पाणी असते. लहान मुलांना तुम्ही घेऊन गेलात तर खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज तिथे करू शकता. आता तिथे ऍडवेंचरस पार्क पण बांधण्यात आले आहे. लहान मुलं तिथे खूप छान एन्जॉय करू शकतात आणि त्यांच्यासोबत तुम्हीसुद्धा एन्जॉय करू शकता त्यामुळे फॅमिली वन डे ट्रिप साठी हे ठिकाण खूप छान आहे.(places to visit near pune) 

आणखी वाचा : भंडारदरा एक निसरगरम्य पर्यटन स्थळ

झपुरजा

आपलं पुढचं ठिकाण आहे झपुरजा पुण्यात अगदी दोन ते तीन वर्षांपूर्वी हे चालू झालं आणि या कमी वेळेत खूप जास्त लोकप्रिय झालं हे ठिकाण आहे खडकवासल्याच्या बॅकवॉटर येथे म्हणजेच कुडजे गावामध्ये पुण्यापासून साधारण ३० ते ३५ किलोमीटरच्या अंतरावरती अगदी तासाभरात तुम्ही इथे पोहोचू शकता. हे ठिकाण म्हणजे तळ्याकाठी असलेली सुंदर आर्ट गॅलरी आणि म्युझियम आहे इथे १० वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या थीमच्या आर्ट गॅलरी आहेत ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची चित्र आहेत स्कल्प्चर्स आहेत म्हणजे शिल्प आहेत साड्या आहेत जुनी भांडी आहेत प्रभात फिल्म कंपनीचा वेगळा सेक्शन इथे त्यांनी बनवलाय ज्यामध्ये जुन्या प्रसिद्ध चित्रपटातले वापरलेल्या वस्तू त्यांनी तिथे ठेवल्यात त्यामुळे या सगळ्या आर्ट गॅलरी बघता बघता पाच सहा तास कसे जातील तुम्हाला कळणार सुद्धा नाही.(places to visit near pune) हा संपूर्ण परिसरच खूप सुंदर आहे त्यांनी छानसे सीट आऊट सुद्धा केलेत त्यांचं ओपन एम्फिथिएटर सुद्धा आहे जिथे कार्यक्रम जरी नसेल तरी तुम्ही निवांत तळ्याचा आनंद घेत तिथे बसू शकता त्यांचं कॅनटीन सुद्धा आहे सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे खूप सारे फेस्टिवल्स आणि म्युझिक कॉन्सर्ट इथे होत असतात त्यामुळे शक्यतो जेव्हा फेस्टिवल असेल तेव्हा जर तुम्ही तुमची ट्रिप प्लॅन केलीत तर अगदी दुग्ध शर्करा योगच म्हणावा लागेल.(places to visit near pune) 

जपालुपी 

पुढचं ठिकाण आहे जपालुपी तर हे ठिकाण आहे तळेगावच्या जवळ पुण्यापासून साधारण ३५ किलोमीटर अंतरावरती प्राणी प्रेमींसाठी हे ठिकाण म्हणजे स्वर्गच. जापालुपी काय आहे तर जपालुपी हा पाळीव प्राण्यांचा एक मोठा फार्म आहे हे सगळे जे प्राणी आहेत ते प्रचंड माणसाळलेले आहेत(places to visit near pune) आणि त्यांना तुम्ही थेट खायला घालू शकता त्यांच्यासोबत तुम्ही खेळू शकता त्यामुळे लहान मुलांसाठी तर हे ठिकाण म्हणजे बेस्टच आणि सगळ्यात छान गोष्ट म्हणजे त्यांनी संपूर्ण हे जे ठिकाण आहे ते खूप चांगल्या पद्धतीने मॅनेज केलंय म्हणजे जशा जंगल सफारी असतात तशा या फार्मच्या सुद्धा सफारी असतात जर तुम्ही ग्रुप बुकिंग केलं तर प्रत्येक ग्रुपला एक गाईड दिला जातो तो गाईड तुम्हाला प्रत्येक प्राणी दाखवतो त्यांना खायला कसं घालायचं याचे तुम्हाला इन्स्ट्रक्शन देतो आणि त्याप्रमाणे त्या प्राण्यांना तुम्ही खायला घालू शकता. त्या प्रत्येक प्राण्याची माहिती दिली जाते त्यांची स्पेशलिटी काय ते सुद्धा तुम्हाला तिथे सांगितलं जातं आता तुम्ही म्हणाल की प्राणी प्रेमींसाठी किंवा लहान मुलांसाठी ठीक आहे आम्ही का जावं तर तिथलं फूड, कमाल फूड तिथे मिळतं जे तिकिटामध्ये इंक्लूडेड आहे वुड फायर पिझ्झा तिथला तर लईच भारी होता त्यामुळे संपूर्ण सफारी आणि फूड याचा पॅकेज आहे पर हेड ₹८०० रुपये तुम्ही सकाळचा दुपारचा किंवा संध्याकाळचा स्लॉट घेऊ शकता तुम्हाला सजेस्ट करेन की शक्यतो संध्याकाळचा स्लॉट तुम्ही घ्या म्हणजे उन्हाचा त्रास तुम्हाला होणार नाही पण तुम्हाला एकच सांगायचं आहे की शनिवार रविवार इथे एक एक महिना आधी सगळे स्लॉट बुक होतात तेव्हा या ठिकाणी तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला आठ ते दहा दिवस आधी प्लॅनिंग करावं लागेल.(places to visit near pune) 

सोमेश्वर वाडी

आपलं पुढचं ठिकाण आहे सोमेश्वर वाडी जे पाषाण मध्ये आहे हे सुद्धा खूप जुनं मंदिर आहे ८०० ते ९०० वर्ष जुनं मंदिर आहे. या मंदिरात गेल्यानंतर खूप निवांत वाटतं, छान गोष्ट म्हणजेच मंदिराच्या बाजूला त्यांनी ग्रामसंस्कृती उद्यान डेव्हलप केले आहे. तिथे आपले बारा बलुतेदार किंवा आपली जुनी गावातली जीवनशैली कशी होती हे वेगळ्या पुतळ्यांच्या आधारे त्यांनी दाखवले त्याचबरोबर बारा ज्योतिर्लिंगांची प्रतिकृती सुद्धा इथे केलेली आहे त्यामुळे छान संध्याकाळ घालवण्यासाठी हे ठिकाण बेस्ट आहे.(places to visit near pune)  

रांजण खळगे,निघोज

आपला पुढचा ठिकाण आहे निघोज गावातले रांजण खळगे पुणे नगर रोड वरती निघोज हे गाव आहे या गावामध्ये कुकडी नदी वाहते आणि त्या नदीच्या प्रवाहमुळे खडकांमध्ये दगडांमध्ये रांजण खळगे तयार झालेत बाय द वे आशियातले सगळ्यात मोठ्या रांजण खळग्यांचं गाव म्हणजे निघुजे खूप मोठ्या प्रमाणावरती इथे खळगे आहेत आणि खूप मोठ्या आकारांचे सुद्धा आहेत त्यामुळे निसर्गाचा चमत्कार बघायचा असेल तर हे ठिकाण फार उत्तम.(places to visit near pune) 

वाघेश्वर मंदिर,पवना

आपला पुढचे ठिकाण आहे पवना तळ्यातलं वाघेश्वर मंदिर इथे तुम्हाला जायचं असेल तर उन्हाळाच्या महिन्यातच तुम्हाला प्लॅन करायला पाहिजे कारण हे मंदिर फक्त तीन महिनेच खुल असतं बाकी सगळे महिने हे मंदिर पाण्याखाली असते. हे खूप पुरातन मंदिर आहे जर या मंदिरात तुम्ही गेलात तर एका दगडावर एक दगड रचून हे मंदिर तयार केलंय असं तुम्हाला वाटेल त्याच्या आजूबाजूला खूप मोठी मोकळी जागा आहे सुंदर जलाशय आहे आणि मोकळी जागा असल्यामुळे बऱ्याच कॅम्पिंग ऍक्टिव्हिटी सुद्धा इथे होतात पवना हा संपूर्ण एरियाच खूप छान आहे म्हणजे फक्त ड्राईव्ह करण्यासाठी किंवा वन डे ट्रिप साठी पवना एरिया पावसाळ्यात किंवा उन्हाळ्यात सुद्धा खूप सुंदर आहे.(places to visit near pune) 

जुन्नर

पुढचं पुण्याजवळ ठिकाण आहे जिथे भारतातल्या सगळ्यात जास्त लांब लेण्या आणि गुहा आहेत आणि ते ठिकाण म्हणजे जुन्नर. जुन्नर या एका तालुक्यात २०० पेक्षा जास्त लेण्या आहेत त्यातल्या काही लेण्या या बौद्धकालीन आहेत काही लेण्यांसाठी तुम्हाला डोंगरावर चढून जावं लागतं त्यामुळे ट्रेक साठी सुद्धा या लेण्या मस्त आहेत आणि जर तुम्हाला कुटुंबासोबत जायचं असेल तर अष्टविनायकापैकी एक असणार लेण्याद्री हे सुद्धा मंदिर या लेण्यांमध्येच आहे. (places to visit near pune) 

सासवड

आपलं पुढचं ठिकाण आहे सासवड सासवड मध्ये बरेच स्पॉट तुम्ही कव्हर करू शकता पुण्यापासून सासवड साधारण ३५ किलोमीटर अंतरावरती आहे. खूप सुंदर जुने वाडे इथे आहेत पेशव्यांचा जुना पुरंदरेवाडा याच गावांमध्ये आहे आणि इथलं जे मंदिर आहे संगमेश्वराचे मंदिर हे खूप पुरातन मंदिर आहे जवळजवळ हजार वर्षांपेक्षा जास्त जुनं हे मंदिर आहे त्याचबरोबर सोपान महाराजांची समाधी सुद्धा सासवड मध्ये आहे सासवड मध्ये खाण्याचे खूप इंटरेस्टिंग स्पॉट्स आहेत.(places to visit near pune)

Exit mobile version