शिवनेरी
नाव :शिवनेरी
उंची: ३५०० फूट
प्रकार:गिरिदुर्ग
चढाईची श्रेणी: मध्यम
ठिकाण: पुणे जिल्हा, महाराष्ट्र, भारत
जवळचे गाव: जुन्नर, जिल्हा पुणे
डोंगररांग: नाणेघाट
सध्याची अवस्था: चांगली
शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात आहे. जुन्नर मध्ये शिरतानांच किल्ल्याचे दर्शन होते. महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे हे जन्मस्थान आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मामुळे ‘शिवनेरी’ किल्ल्यास महाराष्ट्राच्या इतिहासात एक महत्वाचे स्थान आहे.या किल्ल्याला चारही बाजूंनी कठीण चढाव असून जिंकावयास कठीण असा याचा बालेकिल्ला आहे. किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदिर व राजमाता जिजाबाई व बाल-शिवाजी यांच्या प्रतिमा आहेत. दिनांक २६ मे, इ.स. १९०९ रोजी भारत सरकारच्या पुरातत्व विभागाने या किल्ल्याला महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.
किल्ल्यावरील पाहण्याची ठिकाणे :
शिवाई देवीचे मंदिर:
किल्ल्याला भेट देताना, शिवाई मंदिराकडे जाण्यासाठी पाचव्या दरवाजातून म्हणजे शिपाई दरवाजातून पुढे जावे. या मंदिराच्या मागे खडकात ६-७ सुंदर गुहा असून, या गुहेमध्येच शिवाई देवीची सुंदर मूर्ती आहे. या देवीवर राजमाता जिजाऊ यांची विशेष श्रद्धा होती.
अंबरखाना:
जर तुम्ही मागच्या दरवाजाने शिवनेरी किल्ल्यावर प्रवेश केला तर तुम्हाला लगेच अंबरखाना पाहता येतो. याचा वापर अन्नधान्य साठवण्यासाठी केला जात असे सध्या त्याचे गंभीर नुकसान झाले आहे. अंबरखाना हे किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांसाठी एक लोकप्रिय आकर्षण आहे.
पाण्याचे टाके:
किल्ल्याच्या मधोमध एक तलाव बांधण्यात आला आहे, ज्यामध्ये गंगा आणि यमुनेच्या झऱ्यांचे पाणी सतत वाहत असते.
शिवकुंज:
शिवाजी महाराजांचे शिवनेरी किल्ल्यावरील स्मारक शिवकुंज होय. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री श्री यशवंतराव चव्हाण यांनी या भव्य वास्तूची पायाभरणी केली होती.
कमानी मशीद , कडेलोट स्थान , बदामी तलाव
कोळी चौथरा: शिवाजी महाराजांच्या काळात महादेव कोळी समाजाकडे मुघल व आदिलशाहचे विशेष लक्ष नव्हते याचाच फायदा घेऊन काही महादेव कोळी लोकांनी शिवनेरी किल्ला व त्याच्या आजूबाजूच्या प्रदेशाचा ताबा घेतला.त्यामुळे त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी मुघलानी लगेच शिवनेरी वर आक्रमण केले व या आक्रमणपुढे नवख्या कोळी सैन्याने हार पत्करली व सुमारे १५०० महादेव कोळी सैनिकाना जेरबंद करण्यात आले होते. माथ्यावर असलेल्या एका जागेवर त्यांचा शिरच्छेद करण्यात आला होता. या घटनेची आठवण म्हणून या ठिकाणी चौथरा बांधण्यात आला त्यास कोळी चौथरा असे म्हणतात.
किल्ल्याजवळील गावात कसे पोहोचाल :
विमानाने कसे पोहोचाल –
जवळचे विमानतळ – पुणे विमानतळ
रेल्वेने कसे पोहोचाल –
जवळचे रेल्वे स्थानक – किल्ल्यापासून ९४ किमी अंतरावर पुणे रेल्वे स्टेशन आहे. या स्थानकावरून अनेक खाजगी गाड्या उपलब्ध आहेत ज्या पर्यटकांना शिवनेरी किल्ल्यावर जाण्यास मदत करतात. जुन्नरला सुमारे ८२ किमी अंतरावर जोडणारे दुसरे रेल्वे स्थानक तळेगाव दाभाडे रेल्वे स्थानक आहे.
रस्त्याने कसे पोहोचाल –
पुणे पासून अंदाजे ९८ कि.मी. अंतरावर हा किल्ला आहे. NH 60 मार्गाने तुम्ही जाऊ शकता.
सार्वजनिक बसने कसे पोहोचाल –
तुम्ही भोसरीला जाण्यासाठी ३५७ क्रमांक बसने जाऊ शकता, कडूस फाट्यापर्यंत ही बस पकडू शकता, त्यानंतर टॅक्सीने शिवनेरी किल्ल्याकडे जाऊ शकता. तसेच, तुम्ही १२१ नंबर बसने भोसरी गावाला जाऊ शकता, तिथून राजगुरुनगरला जाण्यासाठी ३५८ क्रमांकाची बस घेऊ शकता, त्यानंतर टॅक्सीने किल्ल्याकडे जाऊ शकता.