Top 15 waterfalls in maharashtra महाराष्ट्राला सह्याद्री सारखा नयनरम्य पर्वत लाभलेला आहे. याच डोंगररांगांमध्ये पावसाळ्यात निसर्ग सौंदर्याने नटलेले अनेक धबधबे पाहायला मिळतात. तर याच काही धबधब्यांपैकी प्रसिद्ध अशा धबधब्यांची यादी खाली दिलेली आहे. तर या पावसाळ्यात पुणे व मुंबईच्या सभोवतालच्या परिसरात असणाऱ्या या धबधब्यांना नक्की भेट द्या.
या ठिकाणी भेट देताना कृपया कचरा करू नका. धबधब्यांमध्ये किंवा अनोळखी ठिकाणी पोहणे टाळावे त्यामुळे तुमच्या जीवाला धोका होऊ शकतो तसेच नैसर्गिक किंवा मनुष्यहानी होणार नाही याची काळजी घ्यावी.
भिवपुरी धबधबा
भिवपुरी हा धबधबा रायगड जिल्ह्यातील कर्जत जवळील भिवपुरी या ठिकाणी आहे. हा धबधबा फार मोठा नसला तरी येथील दृश्य खूप अप्रतिम व अविस्मरणीय असतात. या धबधब्याला भेट देण्यासाठी तुम्ही मुंबई, पुणे किंवा मुरबाड, बदलापूर अशा विविध ठिकाणाहून येथे येऊ शकता. या धबधब्याचा आनंद घ्यायचा असेल तर सोबत कोरडे कपडे आणि टॉवेल घेऊन जायला विसरू नका. पावसाळ्याच्या जून ते ऑगस्ट या महिन्यात तुम्ही या धबधब्याला भेट देऊ शकता. या धबधब्याजवळच काही हॉटेल्स तसेच काही लहान मोठ्या टपरी देखील आहेत ज्यामध्ये तुम्ही भुट्टा किंवा इतर स्नॅक्स चा आनंद घेऊ शकता.(top 15 waterfalls in maharashtra)
अंतर : भिवपुरी हा धबधबा पुण्यापासून ११८ किलोमीटर अंतरावर आहे. तर मुंबईपासून ८० किलोमीटर अंतरावर आहे.
भेट देण्यासाठी योग्य वेळ: या धबधब्याला भेट देण्यासाठी योग्य वेळ म्हणजे पावसाळ्याच्या महिन्यात विशेषतः जुलै ते ऑगस्ट मध्ये. उन्हाळ्यामध्ये हा धबधबा कोरडा असतो.
लिंगमळा धबधबा
लिंगमळा हा धबधबा महाबळेश्वर येथे असून महाबळेश्वर शहरापासून फक्त ६ किलोमीटर अंतरावर आहे. इथे जाण्यासाठी तुम्ही सार्वजनिक वाहतूक किंवा स्वतःच्या गाडीचा वापर करू शकता. या ठिकाणाला भेट देण्यासाठी तुम्हाला तिकीट खरेदी करावे लागते. प्रत्येक व्यक्तीस २० रुपये तिकीट आहे. (top 15 waterfalls in maharashtra) तिकीट काढल्यानंतर तुम्हाला सुमारे २०० पायऱ्या चढून जावे लागेल पुढे गेल्यानंतर दोन मार्ग आहेत. तुम्ही डाव्या बाजूने पुढे गेल्यास तुम्ही लिंगमळा डोव्ह पॉइंट कडे जाता. जेथे नैसर्गिक तलाव आणि नदी मध्ये तयार झालेले छोटे धबधबे तुम्हाला पाहायला मिळतात. आणि जर तुम्ही उजव्या बाजूने वरती गेलात तर तुम्हाला सुंदर लिंगमळा धबधबा बघायला भेटू शकतो. ही दोन्ही ठिकाणी बघण्यासाठी अप्रतिम आहेत.
अंतर: लिंगमळा धबधबा हा मुंबईपासून २५७ किलोमीटर अंतरावर आहे. तर पुणे पासून ११४ किलोमीटर आहे.
भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ: वर्षाच्या कोणत्याही काळात तुम्ही येथे भेट देऊ शकता परंतु तुम्हाला निसर्गाचे अप्रतिम असे दृश्य बघायचे असेल तर जुलै ते ऑक्टोंबर या कालावधीत तुम्ही या ठिकाणाला भेट देऊ शकता परंतु पावसाळ्यात या ठिकाणी होऊ नका कारण ते धोकादायक ठरू शकते.
भाजे धबधबा
भाजे धबधबा हा कामशेत पासून १३ किलोमीटर अंतरावर आहे. हा धबधबा भाजे लेण्यांचा एक भाग आहे. भारतीय पुरातत्व खात्याने संरक्षित केलेल्या जागांपैकी ही एक जागा आहे. जर तुम्ही पावसाळ्यात कामशेतला भेट देणार असाल तर या ठिकाणी तुम्ही नक्कीच भेट देऊ शकता.(top 15 waterfalls in maharashtra)
अंतर: हा धबधबा पुणे पासून ६० किलोमीटर तर मुंबईपासून ९६ किलोमीटर अंतरावर आहे.
भेट देण्यासाठी योग्य वेळ: या धबधब्याला भेट देण्यासाठी योग्य वेळ म्हणजे पावसाळ्याचा जून ते सप्टेंबर चा काळ होय.
अम्ब्रेला धबधबा
हा धबधबा महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाणांपैकी असलेल्या भंडारदरा येथे आहे. हा धबधबा नैसर्गिक धबधबा नसून धरणातून बाहेर पडणारे जास्तीचे पाणी जेव्हा या दगडावर पडते त्यामुळे त्याला छत्रीसारखा आकार निर्माण होतो त्यामुळे या धबधब्याला अम्ब्रेला धबधबा असे म्हणतात.(top 15 waterfalls in maharashtra)
अंतर: हा धबधबा मुंबईपासून १६१ किलोमीटर तर पुणे पासून १६८ किलोमीटर अंतरावर आहे.
भेट देण्यासाठी योग्य वेळ: या ठिकाणाला भेट देण्यासाठी योग्य वेळ ही पावसाळ्यात असून येथील स्थानिक अधिकारी पाणी सोडण्यापूर्वी स्थानिक वृत्तपत्रात याबाबत माहिती देतात या माहितीचा आधारावर तुम्ही या ठिकाणाला भेट देऊ शकता.
कुणे धबधबा
हा धबधबा जुन्या पुणे मुंबई महामार्गावर आहे. लोणावळा आणि खंडाळा दरम्यान असलेल्या हा धबधबा भारतातील १४ वा सर्वात मोठा धबधबा आहे. या धबधब्याचे दोन भाग असून सर्वात उंचावरील भाग १०० मीटर उंचीवर आहे. या धबधब्यामुळे तयार झालेला डबक्यात तुम्ही पोहू शकता.
अंतर: कुणे धबधबा मुंबईपासून ८० तर पुणे पासून ७० किलोमीटर अंतरावर आहे.(top 15 waterfalls in maharashtra)
भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ: या ठिकाणाला तुम्ही वर्षभरात कोणत्याही वेळी भेट देऊ शकता परंतु तुम्हाला निसर्गाचे अप्रतिम असे दृश्य बघायचे असेल तर पावसाळ्यात विशेषत: जून ते ऑक्टोबर या काळात या ठिकाणाला भेट द्या.
ठोसेघर धबधबा
हा धबधबा महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील ठोसेघर या ठिकाणी आहे. तारळी नदीवर असलेला हा धबधबा पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख धबधबापैकी एक आहे.
अंतर: हा धबधबा पुणे पासून १३९ किलोमीटर तर मुंबईपासून २८० किलोमीटर अंतरावर आहे.
अधिक वाचा: अलिबाग मध्ये भेट देण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणे
भेट देण्यासाठी योग्य वेळ: पर्यटकांसाठी प्रमुख आकर्षण असलेला हा धबधबा दरवर्षी जून महिन्यात वाहण्यास सुरुवात होते.(top 15 waterfalls in maharashtra)
भांबवली वजराई धबधबा
हा धबधबा भारतातील सर्वात उंच धबधबा याची उंची १८४० फूट आहे. हा धबधबा महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात असून प्रसिद्ध कास पठार पासून ५ किलोमीटर अंतरावर आहे. हा धबधबा बारमाही असून त्यामुळे या ठिकाणाला तुम्ही वर्षातील कोणत्याही वेळी भेट देऊ शकता.
अंतर: वजराई धबधबा हा पुणे पासून १४२ किलोमीटर तर मुंबईपासून २८२ किलोमीटर अंतरावर आहे.
भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ: जरी बारमाही असला तरी तुम्हाला विहंगम दृश्य बघायचे असल्यास पावसाळ्यात या ठिकाणाला भेट द्यावी.
दुगारवाडी धबधबा
हा धबधबा नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर पासून दुगारवाडी या ठिकाणी आहे हा धबधबा वागची या नदीवर आहे. हे स्थान प्रेक्षणीय असून तसेच धोकादायक सुद्धा आहे त्यामुळे येथे भेट देताना खबरदारी घेणे आवश्यक आहे.
अंतर: हा धबधबा पुणे पासून २५० तर मुंबईपासून १८५ किलोमीटर अंतरावर आहे.(top 15 waterfalls in maharashtra)
भेट देण्यासाठी योग्य वेळ: पावसाळ्यात विशेषतः जुलै ते सप्टेंबर या काळात या ठिकाणाला तुम्ही भेट देऊ शकता परंतु या ठिकाणी जाताना योग्य ती काळजी व खबरदारी घेणे आवश्यक आहे.
अधिक वाचा: महाराष्ट्रातील प्रसिद्ध ज्योतिर्लिंग
दाभोसा धबधबा
हा धबधबा महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील दाभोसा या गावात असून मुंबई जवळील सर्वात उंच धबधब्यांपैकी हा एक आहे. हा धबधबा लेंडी नदीवर आहे.
अंतर: हा धबधबा मुंबईपासून केवळ १५० तर पुणे पासून २६० किलोमीटर अंतरावर आहे.(top 15 waterfalls in maharashtra)
भेट देण्यासाठी योग्य वेळ: पावसाळ्यात हा धबधबा एक अप्रतिम व अविस्मरणीय असे रूप घेतो त्यामुळे जुलै ते ऑक्टोंबर या काळात तुम्ही येथे भेट देऊ शकता.
चायनामन धबधबा
चायनामन धबधबा महाबळेश्वर मधील लोकप्रिय धबधब्यांपैकी हा एक धबधबा आहे. हा धबधबा त्याच्या विलोभनीय सौंदर्यामुळे सर्वांचेच लक्ष वेधून घेतो. येथून तुम्हाला कोयना खोऱ्याचे विहंगम व विलक्षण असे दृश्य दिसते.(top 15 waterfalls in maharashtra)
अंतर: हा धबधबा पुणे पासून १२३ किलोमीटर अंतरावर आहे.
मुंबईपासून सुमारे २२० किलोमीटर दूर आहे.
भेट देण्यासाठी योग्य वेळ: पावसाळ्याचा काळ हा या धबधब्याला भेट देण्यासाठी एक आदर्श वेळ आहे.
देवकुंड धबधबा
हा रायगड जिल्ह्यातील भीरा येथे आहे. सोशल मीडियावर व्हायरल झाल्यापासून हे ठिकाण अत्यंत गजबजलेले तसेच धोकादायक बनला आहे. हे ठिकाण तीन धबधब्यांचा संगम असून या ठिकाणी कुंडलिका नदीचा उगम होतो असे मानले जाते. या ठिकाणी पोहोचण्यासाठी तीन तासाचा ट्रेक करावा लागतो त्यामुळे या ठिकाणी जाताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी.
अंतर: पुणे पासून हा धबधबा १०० किलोमीटर तर मुंबईपासून १२५ किलोमीटर अंतरावर आहे.
भेट देण्यासाठी योग्य वेळ: हा धबधबा सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक गर्दी करतात त्यामुळे या ठिकाणी भेट देण्यासाठी सप्टेंबर हा काळ योग्य ठरू शकतो.
मढे घाट धबधबा
हा धबधबा भाटगर धरणाच्या बॅक वॉटर परिसरात आहे या धबधब्याचे नाव लक्ष्मी धबधबा असे आहे. हा धबधबा तोरणा किल्ल्याच्या मागे असलेल्या घनदाट जंगलात असून या ठिकाणाहून रायगड किल्ला लिंगाणा, वरंधा घाट, शिवथरगळ अशा विस्तीर्ण परिसराचे दर्शन घडवितो.(top 15 waterfalls in maharashtra)
अंतर: हा धबधबा पुणे पासून ६५ किलोमीटर अंतरावर आहे तर मुंबई शहरापासून २१० किलोमीटर अंतरावर आहे.
भेट देण्यासाठी योग्य वेळ: पावसाळ्यात विशेषत: जुलै ते ऑक्टोंबर या काळात या ठिकाणी तुम्ही भेट देऊ शकता.
काळू धबधबा
हा धबधबा माळशेज भागातील सर्वात उंच व सर्वात मोठा धबधबा आहे तसेच या ठिकाणी पर्यटक फार कमी वेळा भेट देतात. हा धबधबा मुख्य रस्त्यावरून सुद्धा दिसतो. या धबधब्याजवळ अजून एक धबधबा ज्याला माहुली धबधबा असे म्हणतात स्थानिकांच्या मते काळू धबधबा आणि माहुली धबधबा मिळवून काळू नदी बनते.
अंतर: हा धबधबा मुंबईपासून सुमारे १३२ किलोमीटर अंतरावर आहे तसेच पुणे पासून तो ११८ किलोमीटर अंतरावर आहे.(top 15 waterfalls in maharashtra)
भेट देण्यासाठी योग्य वेळ: काळू धबधबा हा हंगामी धबधबा असून पावसाळ्यात तो मोठ्या प्रमाणात वाहतो तर उन्हाळ्यात कोरडा असतो त्यामुळे त्या ठिकाणी भेट देण्यासाठी सर्वोत्तम महिने सप्टेंबर ते ऑक्टोबर आहे.
कातळधर धबधबा
हा धबधबा महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील लोणावळा जवळ आहे. हा धबधबा इतर धबधबाप्रमाणे प्रसिद्ध नसून येथे जाण्यासाठी तुम्हाला दरीत उतरावे लागते. कातळधर धबधबा हा राजमाची किल्ला जवळ आहे.(top 15 waterfalls in maharashtra)
अंतर: कातळधर धबधबा पुणे पासून ८३ किलोमीटर अंतरावर आहे तर मुंबईपासून ९४ किलोमीटर अंतरावर आहे.
भेट देण्यासाठी योग्य वेळ: पावसाळ्यात जून ते सप्टेंबर या काळात तुम्ही या ठिकाणाला भेट देऊ शकता.
दूधसागर धबधबा
हा धबधबा भारताच्या गोवा राज्यातील मांडावी नदीवर आहे. भारतातील सर्वात उंच धबधब्यांपैकी हा एक धबधबा आहे. हा धबधबा पश्चिम घाटातील भगवान महावीर अभयारण्य आणि मोलेम राष्ट्रीय उद्यानात आहे.(top 15 waterfalls in maharashtra)
अंतर: पुणे पासून हा धबधबा ४५० किलोमीटर तर मुंबईपासून ६०० किलोमीटर अंतरावर आहे.
भेट देण्यासाठी योग्य वेळ: या ठिकाणी भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ म्हणजेच पावसाळ्यात विशेषत: जुलै ते ऑक्टोबर या काळात
One Comment