ramanavmi | रामनवमी

ramanavmi

हिंदू पंचागानुसार चैत्र महिन्यातील नवरात्राचा नववा दिवस म्हणजे चैत्र शुद्ध नवमी या दिवशी भगवान विष्णूचे सातवे अवतार अर्थात भगवान रामाचा जन्म झाला. नवमीचा दिवस असल्यामुळे हा दिवस “रामनवमी” म्हणून साजरा केला जातो.(Ramanavmi)

पुराण ग्रंथानुसार त्रेतायुगातील राक्षस रावणाचे अत्याचार संपवण्यासाठी तसेच धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी भगवान विष्णूने आपल्या सातव्या अवतारात प्रभू श्री राम म्हणून जन्म घेतला.

 

ramanavmi

ramanavmi

हिंदू धर्मग्रंथ रामयनानुसार राजा दशरथ यांना ३ बायका होत्या, राणी कौशल्या, राणी कैकयी व राणी सुमित्रा परंतु यापैकी कोणीही राजा दशरथ यांना संततीचे सुख देऊ शकले नव्हते. त्यामुळे राजा दशरथ नेहमी दुखी असायचे.

वशिष्ठ ऋषींनी राजा दशरथ यांना पुत्रप्राप्तीसाठी पुत्रकामेष्टी यज्ञ करण्याची कल्पना दिली त्यानुसार राजा दशरथ यांनी हा यज्ञ केला.हा यज्ञ चालू असतानी यज्ञकुंडातून एक दैवी पुरुष हातात खीरची वाटी घेऊन बाहेर आला. यज्ञ संपल्यानंतर महर्षीनी दशरथाच्या तीन राणीना खीरची वाटी खायला दिली.

ही खीर खाल्ल्यानंतर काही महिन्यातच तिन्ही राण्या गरोदर राहिल्या व त्यानंतर राणी कौशल्या यांनी राम, राणी कैकयी यांनी भरत तर राणी सुमित्रा यांनी लक्ष्मण व शत्रुघ्न यांना जन्म दिला.(ramanavmi)

रामनवमीच्या च्या दिवशी दुपारी १२ वाजता रामजन्म सोहळा साजरा केला जातो. भगवान श्रीरामाच्या मूर्तीला पाळण्यात घातले जाते व रामजन्माचा पाळणा म्हटला जातो. भगवान श्री रामाच्या मूर्तीस हार अर्पण केले जातात.

भगवान श्री रामाच्या मूर्तीवर  हळद-कुंकू वाहताणी सर्व प्रथम हळद वाहिली जाते त्यानंतर कुंकू वाहिले जाते व मूर्तीस केवडा, चंपा जाई व जुई ची फुले वाहिली जातात.(ramanavmi) 

रामनवमीच्या दिवशी मंदिरात भजन, कीर्तन, प्रवचन यासारख्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. शोभायात्रा काढल्या जातात. 

संपूर्ण भारतात रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. चैत्र नवरात्रीची समाप्ती सुद्धा याच दिवशी होते. काहीलोक हे पूर्ण ९ दिवस उपवास करतात तर काही लोक फक्त रामनवमीच्या दिवशी उपवास करतात.(ramanavmi) 

भारतवर्षात जरी रामनवमी चैत्र शुद्ध नवमी ला साजरी केली जात असली तरी ज्या ठिकाणी प्रभू श्री रामांचा जन्म झाला अयोध्या येथील वैश्य समाज मार्गशीष महिन्यातील पंचमीला प्रभू श्री रामांचा जन्म झाला असे मानतो.

यंदा रामनवमी १७ एप्रिल २०२४ रोजी साजरी केली जाणार आहे. रामनवमीच्या दिवशी रामरक्षा स्त्रोत्रचे पठन करणे अत्यंत शुभ मानले जाते. प्रभू श्रीरामांच्या पूजेत नेहमी ताजी फुले वापरावीत. इतर व्यक्तीसोबत मनात वैरभाव ठेवू नका.   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *