Site icon dnyankosh.in

pratapgad killa | प्रतापगड

pratapgad killa

प्रतापगड हा किल्ला महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध डोंगरी किल्ला असून तो महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात असून महाबळेश्वरपासून सूमारे २१ किलोमीटर अंतरावर आहे. त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची ३५५६ फूट किंवा १०८१ मीटर असून, किल्ल्याच्या दोन्ही बाजूस खोलच खोल दरी आहेत.(pratapgad killa) 

शिवाजी महाराजांनी जावळीच्या मोरे यांचा पराभव केल्यानंतर आपले पंतप्रधान मोरो त्रिंबक पिंगळे यांना हा किल्ला बांधण्यास सांगितला. १६५६ मध्ये या किल्ल्याचे बांधकाम पूर्ण झाले. या किल्ल्याचे दोन प्रमुख भाग असून मुख्य किल्ला व बालेकिल्ला यामध्ये त्याचे विभाजन करण्यात आलेले आहे.

संरक्षणाच्या दृष्टीने किल्ल्याच्या चोहोबाजूस भक्कम तटबंदी व बुरुज आहेत. बालेकिल्ल्याचे क्षेत्रफळ ३६६० चौ. मीटर तर मुख्य किल्ल्याचे क्षेत्रफळ ३८९० चौ. मीटर असून किल्ल्याचे महत्त्वाचे बुरुज म्हणजे अफजल बुरुज, रेडका बुरुज, सूर्य बुरुज, केदार बुरुज हे महत्वाचे बुरुज असून त्यांचे अवशेष अजूनही टिकून आहेत.(pratapgad killa) 

प्रतापगड किल्ल्यावर जाण्यासाठी आपल्याला किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत गाडी नेता येते वाहन तळावर गाडी लावल्यानंतर गडाच्या दक्षिण बुरुजाखालून सरळ एक पायवाट पुढे जाते तेथून आपल्याला पश्चिमाभिमुख महादरवाज्यात जाता येते या दरवाजाची वैशिष्ट्य म्हणजे आजही हा दरवाजा सूर्यास्तानंतर बंद केल्या जातो व सूर्योदयापूर्वी उघडला जातो. 

महादरवाजातून आत गेले असता उजव्या हातालाच चिलखती बांधणीचा बुरुज आपणास दिसून येतो. या बुरुजाच्या बाजूनेच पायरी मार्गाने भवानी मंदिराकडे जाता येते. या मंदिरात भवानी मातेची सालंकृत प्रसन्न मूर्ती, आहे ही मूर्ती महाराजांनी नेपाळमधील गंडकी नदीतून शाळीग्राम शीळा मागवली व त्यातून घडवली असे मानले जाते.या मूर्ती शेजारीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या दैनंदिन पूजेतील स्पटिकांचे शिवलिंग व स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची तलवार आहे. भवानी मंदिर च्या नगारखान्याची खिडकी उघडून पाहिल्यानंतर समोरच देवीचा चेहरा दिसतो. या मंदिराची ही एक कथा सांगितली जाते असे मानले जाते की शिवाजी महाराजांनी या देवीसाठी रोज सनई चौघडा वाजवण्याची प्रथा सुरू केली होती. या मंदिराचे दोन भाग आहेत, सभामंडप व नगरखाना. मंदिर पासून थोडे पुढे चालल्यानंतर पुढे एक छोटेखाने दरवाजा लागतो तिथूनच किल्ल्यात प्रवेश होतो.(pratapgad killa) 

पुढे बालेकिल्ल्याकडे चालू लागल्यास आपल्याला उजव्या हाताला समर्थ रामदास स्वामी स्थापित हनुमानाची मूर्ती दिसून येते पुढे जाऊन बालेकिल्ल्याचे द्वार ओलांडल्यानंतर आपण केदारेश्वर महादेवाच्या मंदिराजवळ जाऊन पोहोचतो. मंदिरात भव्य असे शिवलिंग असून या मंदिरा शेजारीच प्रशस्त सदर आहे. किल्ल्याच्या बुरुजावरून आजूबाजूला पाहिले असता आपल्याला मोठे मोठे डोंगर दिसून येतात या डोंगरांचे एक अनोखेच वैशिष्ट्य आहे. 

केदारेश्वर मंदिराच्या मागील बाजूस राजमाता जिजाबाईंच्या वाड्याचे काही अवशेष आढळून येतात, येथे उजवीकडेच बगीचाच्या मधोमध शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे या पुतळ्याच्या जागीच पूर्वी महाराजांचा राहता वाडा होता असे मानले जाते या पुतळ्याशेजारीच शासकीय विश्राम गृह असून येथील बागेतून उजव्या बाजूने तटबंदीवर जाता येते व तटबंदीवरून जावळीच्या खोऱ्याचे विहंगम दृश्य दिसून येते.(pratapgad killa) 

किल्ल्यावर महादरवाजा सोडून अजून एक दरवाजा आहे तो म्हणजे दिंडी दरवाजा होय दिंडी दरवाजावर घोरपडीचे चित्र असणारा राजपहारी कोरण्यात आलेला आहे. 

किल्ल्याचा इतिहास:

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेनुसार स्वराज्याचे पंतप्रधान मोरोपंत त्रंबक पिंगळे यांच्या देखरेखीखाली या किल्ल्याचे बांधकाम इसवी सन १६५६ मध्ये पार पडले. 

स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज हे जिंजीला जाण्यापूर्वी काही काळ या गडावर वास्तव्यास होते. छत्रपती राजाराम महाराज यांची काकरखाना सोबत झालेली पहिली लढाई याच किल्ल्याच्या पायथ्याशी झाली त्यामध्ये त्यांनी नेत्रदीपक कामगिरी बजावली होती. (pratapgad killa) 

इसवी सन १६५६ ते इसवी सन १८१८ पर्यंत हा किल्ला शत्रूपासून अभेद्यच राहिला. इसवी सन १८१८ मध्ये झालेल्या तिसऱ्या मराठा व इंग्रज युद्धानंतर हा किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात गेला.

अशीच नवनवीन माहिती वाचण्यासाठी येथे CLICK करा.

प्रतापगड हा किल्ला ओळखला जातो तो छत्रपती शिवाजी महाराज व आदिलशाही सरदार अफजल खान यांच्यात झालेल्या लढाईसाठी. या लढाईत अफजल खानाला शिवाजी महाराजांनी मारले. अफजलखानाला मारल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा सहकारी संभाजी कावजी याने अफजलखानाची शीर कापून आणले होते हे शीर येथील एका बुरुजात पुरले असे सांगितले जाते.

स्वातंत्र्योत्तर काळात या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य असा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला या १७ फूटी उंच कांस्याच्या पुतळ्याचे उद्घाटन स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी १९५७ मध्ये केले. (pratapgad killa) 

प्रतापगड किल्ला (pratapgad killa)  प्रवेश शुल्क आणि वेळ:

प्रतापगड किल्ल्यावर प्रवेश करण्यासाठी कोणती प्रवेश शुल्क आकारले जात नाही हा किल्ला सकाळी दहा ते संध्याकाळी सहा पर्यंत पर्यटकांसाठी खुला राहतो. (pratapgad killa) 

प्रतापगड ला भेट देण्यासाठी योग्य वेळ:

कोणताही काळ या किल्ल्याला तुम्हाला भेट देता येऊ शकते पण जर तुम्हाला निसर्गाचे अद्भुत स्वरूप अनुभवायचे असेल तर पावसाळ्यात म्हणजेच जुलै ते सप्टेंबर हा कालावधी अत्यंत उत्कृष्ट राहील कारण येथे दिसणारे पावसाळ्यातील विहंगम दृश्य तुम्हाला कोठेही अनुभवता येणार नाही. 

प्रतापगडला कसे पोहोचाल:

रस्ते मार्ग: साताऱ्यापासून प्रतापगड हा किल्ला ८१ किलोमीटर अंतरावर आहे तर महाबळेश्वर पासून सुमारे २१ किलोमीटर अंतरावर आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस या महाबळेश्वर पासून नियमित स्वरूपात येथे जाण्यासाठी उपलब्ध असतात तसेच तुम्ही खाजगी किंवा शेअर कार घेऊन जाऊ शकता.(pratapgad killa) 

रेल्वे मार्ग: सर्वात जवळील रेल्वे स्थानक हे सातारा रेल्वे स्थानक असून येथून तुम्हाला प्रतापगड या किल्ल्यावर जाण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसने पोहोचता येते.

हवाई मार्ग: प्रतापगड किल्ल्यापासून सर्वात जवळील विमानतळ पुणे हे असून ते सुमारे १५० किलोमीटर अंतरावर आहे.

Exit mobile version