नवरात्रीचे नऊ रंग 2023

नवरात्रीचे नऊ रंग 2023

नवरात्रीचे नऊ रंग 2023

अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षात येणारा हा नवरात्रीचा उत्सव म्हणजे दुर्गा मातेची उपासना करण्याचा सण होय. नवरात्र ही वेगवेगळ्या कारणांसाठी आणि विविध हिंदू सांस्कृतिक क्षेत्रांच्या विविध भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते.

नवरात्र या शब्दाचा शब्दशः अर्थ नऊ रात्रींचा समूह असा होत असून हा सण नऊ रात्री (आणि दहा दिवस) साजरा होतो.

हे नऊ दिवस म्हणजे आश्विन शुद्ध प्रतिपदा ते आश्विन शुद्ध नवमीपर्यंत होय.नवरात्रीचे नऊ रंग 2023 खालीलप्रमाणे तारखेनुसार मांडले आहेत. 

नवरात्रीचे नऊ रंग 2023
१) दिवस पहिला (१५ ऑक्टोबर) रंग केशरी : नारंगी हा रंग सकारात्मक उर्जेने भरलेला असून व्यक्तीचे मन उत्साही ठेवतो. हा रंग परिधान केल्याने ऊर्जा व आनंदाची सहानभूती मिळते.

नवरात्रीचा पहिला दिवस हा शैलपुत्री या पार्वतीच्या अवताराला समर्पित आहे. ही देवी सतीचा (भगवान शिवाची पहिली पत्नी, जी नंतर पार्वती म्हणून पुनर्जन्म घेते) पुनर्जन्म मानली जाते आणि तिला हेमावती म्हणून देखील ओळखले जाते.

२) दिवस दुसरा (१६ ऑक्टोबर) रंग पांढरा : शुद्धता आणि साधेपणाचे प्रतीक असणारा हा रंग सुरक्षिततेची भावना देतो.

नवरात्रीचा दुसरा दिवस हा पार्वतीचा आणखी एक अवतार असलेल्या ब्रह्मचारिणीला समर्पित असून या रूपामध्ये माता पार्वती योगिनी बनली होती.ही देवी आनंद आणि शांततेचे प्रतीक असून, शांती आणि समृद्धीसाठी पूजा केली जाते.

३) दिवस तिसरा (१७ ऑक्टोबर) रंग लाल : लाल रंग हा उत्साह आणि प्रेमाचे प्रतीक असून, हा रंग भक्तांमध्ये शक्ती आणि चैतन्य निर्माण करतो.

नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटाच्या पूजेचे स्मरण केले जाते माता पार्वती ने भगवान शिवाशी विवाह केल्यानंतर स्वत:चे कपाळ अर्धचंद्राने सजवले होते. ती शौर्याचे प्रतीक आहे.

४) दिवस चौथा (१८ ऑक्टोबर) रंग निळा : शांततेचा प्रतीक असणारा निळा रंग सागर आणि आकाशाची अमर्यादा खोली यांची अनुभूती देतो.नवरात्रीच्या चौथ्या दिवशी विश्वाची सर्जनशील शक्ती मानली जाणारी कुष्मांडा देवीची पूजा केली जाते.

५) दिवस पाचवा (१९ ऑक्टोबर) रंग पिवळा : उबदारपणाचे प्रतीक असणार हा रंग व्यक्तीला आनंदी व आशावादी ठेवतो. पाचव्या दिवशी कार्तिकेय ची माता स्कंदमाता ची पूजा केली जाते.

६) दिवस सहावा (२० ऑक्टोबर) रंग हिरवा : हिरवा रंग हा रंग निसर्गाचा, निर्मितीचा, आरोग्याचा आणि सकारात्मक ऊर्जेचा आहे असं म्हटलं जातं.

या रंगामुळे शांतता आणि स्थिरतेची भावना निर्माण करतो.योद्धा देवी म्हणून ओळखली जाणारी कात्यायनी देवीची नवरात्रीच्या सहाव्या दिवशी पूजा केली जाते.ती पार्वती, महालक्ष्मी, महासरस्वती यांचे रूप असून सर्वात हिंसक तिला मानले जाते.

७ ) दिवस सातवा (२१ ऑक्टोबर) रंग राखाडी: राखाडी रंग हा बुद्धिमत्तेचं प्रतीक असून हा अतिशय हरहुन्नरी रंग आहे. दुर्गा देवीचे सर्वात उग्र रूप मानली जाणारी कालरात्रीचे सातव्या दिवशी पूजली जाते. 

८) दिवस आठवा (२२ ऑक्टोबर) रंग जांभळा : सुख-समृद्धी चे प्रतीक असणारा हा रंग भव्यता आणि राजेशाही दर्शवतो.हा रंग कल्पनाशक्ती आणि विकेंद्रीपणाचे प्रतीक आहे.आठव्या दिवशी बुद्धिमत्ता आणि शांतीचे प्रतीक असलेल्या महागौरीचे पूजन केले जाते.

९) दिवस नववा (२३ ऑक्टोबर) रंग मोरपंखी : विशिष्टता दर्शवनारा हा रंग सुख समृद्धी, सुसंवाद आणि आपुलकी दर्शवितो.नवव्या दिवशी अर्धनारीश्वर या नावाने ओळखले जाणाऱ्या सिद्धिदात्री ची पूजा केली जाते.

दिक शास्त्रानुसार या देवीची उपासना करून भगवान शिवाने सर्व सिद्धी प्राप्त केल्या असे मानले जाते.

नवरात्रीचे नऊ रंग 2023 हे दुर्गा देवीच्या नऊ अवताराना (नवदुर्गाना) समर्पित आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *