महालक्ष्मी मंदिर मुंबई
मुंबई मधील प्राचीन व प्रसिद्ध मंदिरांपेकी एक म्हणजे महालक्ष्मी मंदिर होय. या मंदिराची स्थापना हिंदू व्यापारी धाकजी दादाजी यांनी केली होती. अरबी समुद्रकिनारी असणारे हे मंदिर अत्यंत सुंदर व आकर्षक असून अनेक लोकांच्या आस्थेचे प्रतीक आहे.
नवरात्र उत्सवात महालक्ष्मीचा सोहळा अप्रतिम असतो आणि तो बघण्यासाठी संपूर्ण मुंबईकर भक्तिने महालक्ष्मीच्या देवळात येतात.
महालक्ष्मी मंदिरामध्ये महाकाली, महालक्ष्मी आणि सरस्वती या देवीच्या मूर्ती असून मध्यभागी महालक्ष्मी ची मूर्ती आहे.
महालक्ष्मी मंदिराचा इतिहास :-
ब्रिटिश काळात मुंबई बेटातून वरळीला जाण्यासाठी बोटीशीवाय पर्याय नसायचा कारण त्याकाळी जर भरती आली तर समुद्राचे पाणी भायखळा पर्यन्त जायचे. त्यामुळे त्या काळाचे मुंबईचे ब्रिटिश गव्हर्नर जॉन हॉर्नबी याने मुंबई आणि वरळी ही दोन बेट समुद्रात भराव टाकून जोडण्याची योजना आखली होती. या कामाचे कंत्राट रामजी शिवजी यास मिळाले होते ज्यावेळी त्याने या कामाची सुरवात केली तेव्हा त्याच्या असे लक्षात आले की थोडे काम झाले की टाकलेला भराव वाहून जात असून पुनः नव्याने सुरवात करावी लागत आहे.
अश्या वेळी एका रात्री देवीने त्याच्या स्वप्नात येऊन दृष्टान्त दिला की ‘’ मी माझ्या बहिणी सोबत सागर तळाशी असून ज्या दिवशी माझी पुनःस्थापना होईल त्याच वेळी तुझे काम पूर्ण होईल ’’ स्वप्नात सांगितल्याप्रमाणे तीन देवीच्या मूर्ती रामजी ला समुद्र तळाशी सापडल्या व त्यांने स्वत: हजारो रुपये खर्च करून एक मंदिर बांधून त्यात या मूर्तीची स्थापना केली. त्यानंतर समुद्रात भराव टाकण्याचे काम पण विना अडथळा पार पडले.
महालक्ष्मी मंदिर मुंबई जवळील प्रसिद्ध ठिकाणे
१) सिद्धिविनायक मंदिर
२) मुंबा देवी मंदिर
३) संजय गांधी राष्ट्रीय उद्यान
४) एलिफंटा लेणी
५) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस