kenjalgad fort | केंजळगड

kenjalgad fort

महाराष्ट्रातील प्रसिद्ध डोंगरी किल्ल्यापेकी एक म्हणजे केंजळगड होय. हा किल्ला महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात आहे. सातारा पासून हा किल्ला ६५ कि.मी तर पुणे शहरापासून ८६ कि.मी अंतरावर आहे.(kenjalgad fort)

नाव: केंजळगड

उंची: ४२६९ फूट

प्रकार: गिरिदुर्ग

चढाईची श्रेणी: मध्यम

ठिकाण: सातारा, महाराष्ट्र

जवळचे गाव: कोरले, वाई, रायरेश्वर

डोंगररांग: महादेव

सध्याची अवस्था: व्यवस्थित

kenjalgad fort | केंजळगड

हा किल्ला कृष्णा आणि नीरा या दोन नद्यांच्या खोऱ्यातील मध्ये असलेल्या एका डोंगरावर असून समुद्रसपाटी पासून त्याची ऊंची सुमारे १३००मी उंचीवर आहे. या किल्ल्याच्या एका बाजूला कृष्णा नदीवर बांधलेले धोम धरण असून दुसऱ्या बाजूला नीरा नदीवर बांधलेले देवधर धरण आहे.

गडाच्या पायथ्याशी असलेल्या गावाचे नाव कोर्ले असून तेथून रायरेश्वर ला सुद्धा जाता येते. रायरेश्वर आणि केंजळगड हे मध्ये असलेल्या एका छोट्या खिंडी मुळे  एकमेकांपासून वेगळे झाले आहेत. या खिंडी मधून आपल्याला वाई कडे जाता येते.

या खिंडी च्या आली कडे  केंजळगडच्या दिशेने जाण्यासाठी एक कच्चा रस्ता जातो. या रस्त्याने पुढे गेल्यास काही अंतरावर केंजळमाता मंदिर व ८-१० घरांची वस्ती दिसते. याला केंजळमाची असे म्हणतात. केंजळमाची मधून एक छोटी पाऊलवाट आपल्याला गडाकडे  घेऊन जाते. थोडे अंतर पार केल्यावर आपल्याला एक उद्ध्वस्त झालेला दरवाजा दिसून येतो, हाच तो या किल्ल्याचा पहिला दरवाजा.(kenjalgad fort)

पहिल्या दरवाजा मधून पुढे गेल्यावर आपल्याला एक पाण्याचे टाके व एक मानवनिर्मित गुहा लागते. या पाण्याच्या टाक्याच्या आजूबाजूला काही जुन्या बांधकामाचे अवशेष आहेत. इथेच पुढे दगडा मध्ये अत्यंत सुबक कोरलेल्या ५४ पायऱ्याचा जिना असून तोच आपल्याला पुढे किल्ल्यावर घेऊन जातो.

पूर्व-पश्चिम पसरलेल्या या किल्ल्याचा विस्तार कमी आहे. गडाच्या माथ्यावर पाण्याचा एक छोटा तलाव आहे. गडावर जुन्या मंदिराचे अवशेष असून तिथे काही जुन्या मूर्ती आढळून येतात. हेच गडावरील केळंजाई देवीचे मंदिर आहे. या मंदिराच्या मागील बाजूस एक चुन्याचा घाणा आहे.(kenjalgad fort) kenjalgad fort

या किल्ल्याची ऊंची जवळ असलेल्या इतर डोंगरापेक्षा जास्त असल्यामुळे या किल्ल्यावरून तोरणा, पांडवगड, पुरंदर, राजगड, रायगड, रोहिडा, लिंगाणा, वज्रगड, वैराटगड, सिंहगड हे किल्ले सहज दिसून येतात. किल्ल्यावर राहण्याची व्यवस्था नाहीये त्यामुळे तुम्ही किल्ल्याच्या खाली असलेल्या केंजळमाची येथील मंदिरात थांबू शकता तसेच जेवणाची सोय देखील इथे होऊ शकते.

केंजळगड पासून जवळच रायरेश्वरचे पठार असून याच ठिकाणी असलेल्या महादेवाच्या मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजानी स्वराज्याची शपथ घेतली होती, जर तुम्ही केंजळगडला भेट देणार असाल तर रायरेश्वरला सुद्धा अवश्य भेट द्या.(kenjalgad fort) रायरेश्वर पठार

केंजळगडला कसे पोहचाल:

केंजळगड किल्ल्यावर जाण्यासाठी प्रामुख्याने २ मार्ग आहेत, एक म्हणजे भोर मार्गे जो पुण्यावरून जाणाऱ्यांसाठी एकडूम सोयीचा मार्ग आहे, तर दूसरा मार्ग म्हणजे वाई मार्गे.पुण्यापासून हा किल्ला सुमारे ८३ किलोमीटर् अंतरावर आहे त्यासाथी तुम्हाला साधारण २-२.३० तास लागू शकतो. 

जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या सातारा पासून हा किल्ला ६५ कि.मी अंतरावर आहे रस्ते मार्गाने इथे सहज जाता येते. वाई येथून दर तासाला महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या बस उपलब्ध असतात.      

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *