काळूबाई मांढरदेवी
काळूबाई महाराष्ट्रातील पुणे व सातारा जिल्ह्यांच्या सीमेवर, सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील मांढरदेव येथील श्रीकाळेश्वरी म्हणजेच काळूबाई चे मंदिर आहे.हे मंदिर शंभु-महादेव या डोंगररांगेवर असून समुद्रसपाटी पासून ५००० फुट उंचीवर आहे.
काळूबाईची मूर्ती स्वयंभू असून मूर्ती चतुर्भुजी आहे.देवीआईच्या उजव्या हातात त्रिशूल आणि तलवार आहे.तसेच देवीच्या डाव्या हातात ढाल आणि दैत्याची मान धरलेली आहे. देवीची मूर्ती उभी असून तिचा एक पाय दैत्याच्या छातीवर ठेवलेले आहे.
पौषी यात्रेच्या दोन दिवस अगोदर जागर, छबिना व मुख्य दिवशी महाअभिषेक, पूजा केली जाते. या यात्रेत सासनकाठीचा आणि पालखीचा मान परंपरेप्रमाणे पायी वारी करणारे पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील मौजे ‘बोपगावच्या फडतरे’ यांना असतो.
हे मंदिर हिंदूं धर्माच्या लोकांमध्ये लोकप्रिय आहे. तसेच दर वर्षी जानेवारी महिन्यात दहा दिवसांच्या कालावधीत वार्षिक जत्रा यात्रा काढली जाते. या जत्रेचा मुख्यकार्यक्रम म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी 24-तासांचा उत्सव आहे, ज्यामध्ये मांढरदेवी काळूबाईने मारलेल्या देवीच्या राक्षसांना प्राण्यांचे बलिदान दिले जाते. देवीला पुरणपोळी (एक गोड) आणि दही भाताचा नैवद्य दाखवला जातो.
या धार्मिक कार्यक्रमाला साधारणतः 300,000 पेक्षा जास्त भाविक दर वर्षी या ठिकाणी येतात.
मंदिराच्या ठिकाणी राहण्याची आणि खाण्याची उत्तम सोय उपलभ्द्ध आहे. तसेच गाडी पार्किंग साठी वाहनतळ उपलब्ध आहेत.
मंदिराच्या जवळील ठिकाणे :
१) नाना फडणवीस वाडा – मेणवली
२) श्री काशी विश्वेश्वर मंदिर – वाई
३) ढोल्या गणपती – वाई
४) पांडवगड किल्ला – सातारा
५) वैराटगड – सातारा
मंदिरात कसे पोहचाल :
१) पुणे ते मांढरदेवी – पुण्यापासून ८३ कि.मी चा प्रवास आहे यासाठी तुम्हाला साधारण २ तासाचा वेळ लागू शकतो. पुणे एसटी विभागाकडून स्वारगेट, शिवाजीनगर येथून नियमितपणे गाड्या उपलभ्द्ध आहे.
२) वाई ते मांढरदेवी- वाईपासून १९ कि.मी चा प्रवास आहे यासाठी तुम्हाला साधारण ३६ मिनिटाचा वेळ लागू शकतो. तसेच MIDC विभागाकडून वाई ते मांढरदेवी बस सेवा उपलभ्द आहेत.
३) सातारा ते मांढरदेवी – सातारा पासून हा प्रवास ५७ कि.मीचा आहे. तसेच MIDC विभागाकडून सातारा ते मांढरदेवी बस सेवा उपलभ्द आहेत.