janjira killa

नाव: जंजिरा
प्रकार: जलदुर्ग
चढाईची श्रेणी: मध्यम
ठिकाण:रायगड जिल्हा, महाराष्ट्र
जवळचे गाव: राजापुरी 

janjira killa| जंजिरा किल्ला 

जजीरे मेहरुब अर्थातच मुरुड चा जंजीरा किल्ला. जंजिरे हा मूळ अरबी भाषेतील शब्द असून याचा अर्थ बेट असा होतो.चारही बाजूंनी अरबी समुद्रने घेरलेला हा किल्ला अनेक वर्ष अजिंक्य राहिलेला होता.(janjira killa)

समुद्रकिनारी असलेल्या गावापैकी राजापुरी हे खाडी च्या जवळ असेलेले गाव आहे. येथे मुख्य:त कोळी लोकांची वस्ती होती. या कोळयांना समुद्री चाचे व लुटारू नेहमीच त्रास देत असत. त्यामुळे निजामी ठाणेदाराची परवानगी घेऊन त्याठिकाणी एका मेढेकोट बांधण्याची परवानगी मिळवली.

जंजिरा किल्ला

मेढेकोटाची परवानगी मिळताच कोळी प्रमुख  निजामी ठाणेदाराला जुमेनासा झाला. त्यामुळे ठाणेदाराने त्याचा बंदोबस्त करण्यासाठी आपल्या एका सरदाराची नेमणुक करून त्याचा बंदोबस्त केला, व त्याठिकाणी एका किल्ल्याची बांधणी केली तो किल्ला म्हणजेच ‘जंजिरा’ होय.(janjira killa)

जंजिरा किल्ला

पुढे इ.स.१६१७ मध्ये सिद्दी अंबर याने स्वतंत्र सनद मिळवून जहागिरी प्राप्त केली.हे आफ्रिकन मूळ असलेले लोक दर्यावर्दी शूर, काटक व दणकट होते. यांनी हा किल्ला १६१७ ते १७३४ म्हणजे सुमारे ११७ वर्ष अजिंक्य ठेवला होता.

जंजिरा किल्ला

जंजिऱ्याचे प्रवेशद्वार पूर्वभिमुख आहे. राजपुरीहून या किल्ल्यावर शिडाच्या होड्यांनी जाता येते. होडीने किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचल्यावर, मुख्य प्रवेशद्वाराच्या आत एक उपद्वार आहे. तेथे एक शिल्प आहे ज्यामध्ये एका वाघाने चारही पायात चार हत्ती पकडले असून त्याच्या शेपटीत एक हत्ती गुंडाळला आहे. हे शिल्प असे सुचवते कि “किल्ल्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याचे धाडस करू नका.”(janjira killa)

जंजिरा किल्ला

सिद्दी सरदारानी अनेक वर्ष हा किल्ला अजिंक्य ठेवला होता छत्रपती संभाजी महाराजानी सुद्धा हा किल्ला ताब्यात घेन्याचा प्रयत्न केला त्यासाठी त्यांनी जंजिरा पासून ४/५ कि. मी. अंतरावर पदमदुर्ग किल्ला सुद्धा बांधला परंतु त्यांना सुद्धा यामध्ये अपयश आले. १७३४ मध्ये चिमजीआप्पा यांनी हा किल्ला जिंकून स्वराज्यात आणला.(janjira killa)

जंजिरा किल्ला जवळील पाहायची पर्यटन स्थळे :

१)दिवेआगर बीच: महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील कोकण किनार्‍यालगत वसलेला, दिवेआगर समुद्रकिनारा हा एक मौलिक दागिना म्हणून उभा आहे. दिवेआगर, कोकण पट्ट्यातील एक विलक्षण किनार्यावरील गाव, हे फक्त समुद्रकिनाऱ्याचे ठिकाण नाही – हे निसर्ग, संस्कृती आणि शांतता यांचे एक प्रसिद्ध स्थान आहे.

२)पदमदुर्ग किल्ला: सिद्दी चा बंदोबस्त करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजानी बांधलेला हा किल्ला असून याला “कासा” या नावाने सुद्धा ओळखले जाते.सध्या हा किल्ला भारतीय नौदलाच्या ताब्यात असून तेथे जाण्यासाठी परवानगी घ्यावी लागते.

किल्ल्याचे २ भाग असून एक मुख्य किल्ला आणि दूसरा पडकोट.किल्ल्यावर तोफा, जुन्या इमारती चे अवशेष पाहायला मिळतात.

३)उत्तरेश्वर मंदिर: दिवेआगरच्या उत्तरेकडे असलेल्या या प्राचीन शिवमंदिराला उत्तरेश्वर म्हणतात. जांभळ्या दगडाच्या बाहेरील भिंती आणि टाइलचे छत आधुनिक दिसते पण गर्भगृह आणि उद्ध्वस्त झालेले नियम असे दर्शवतात की मूळ मंदिर ७०० ते ८००  वर्षे जुने असावे. शासनाकडून त्याची पुनर्बांधणी केली आहे. मुरुड पासून हे मंदिर २८ कि. मी अंतरावर आहे.(janjira killa)

४)नांदगाव बीच: नारळाच्या झाडांच्या सुंदर पार्श्वभूमीत स्थित असलेला हा एक शांत आणि सुंदर समुद्रकिनारा आहे. ज्यांना शांतता आणि प्रायवसी आवडते त्यांच्यासाठी नांदगाव समुद्रकिनारा एक सर्वोतम पर्याय आहे. नांदगाव समुद्रकिनारा मुरुड पासून ९ कि. मी अंतरावर आहे.

५)फणसाड वन्यजीव अभयारण्य: सुमारे ६९७९ हेक्टर जमिनीच्या मोठ्या क्षेत्रावर पसरलेले, फणसाड वन्यजीव अभयारण्य प्रामुख्याने किनारपट्टीच्या जंगलाच्या संरक्षणासाठी असून,वन्यजीव प्रेमी आणि निसर्ग प्रेमींसाठी हे एक उत्तम स्थळ आहे. हे अभयारण्य वनस्पती आणि प्राण्यांनी समृद्ध आहे.(janjira killa)

वनस्पतीचे / झाडाचे विविध प्रकार जसे कि निम्न-सदाहरित, सदाहरित, मिश्र पानझडी आणि कोरडे पानझडी जंगले असे सर्व प्रकार इथे आढळून येतात.

जंजिरा किल्लाला कसे पोहचाल :

रस्ते मार्ग: मुंबई पासून अंदाजे १५० कि. मी अंतरावर हा किल्ला असून राष्ट्रीय महामार्ग ६६ वरुन ४ तासामधे इथे सहज पोचू शकता. पुणे ते मुरुड हे अंतर १६० कि. मी असून ४/५ तासामध्ये इथे सहज पोचता येते.

रेल्वे मार्ग: मुरुड ला जाण्यासाठी सर्वात जवळील रेल्वे स्टेशन रोहा असून रोहा ते मुरुड हे अंतर ४० कि.मी. आहे जे तुम्ही येथे उपलब्ध असलेल्या ऑटो रिक्षा, लोकल बसचा वापर करून सहज पार करता येते.

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *