गुढीपाडवा हा एक हिंदू सण आहे. जो कि हिंदू दिनदर्शिकाच्या पहिल्या महिन्यात म्हणजे चैत्र महिन्यात साजरा केला जातो.(gudhipadwa)
चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी हा सण साजरा केला जातो. हा सण घरासमोर गुढी उभारून साजरा केला जातो.
घरासमोर उभारलेली गुढी ही विजयाचे प्रतीक मानली जाते.
गुढीपाडवा
गुढीपाडवा हा सण पवित्र अश्या मानल्या जाणाऱ्या साडे तीन मुहूर्तपेेकी एक असून यादिवशी नवीन वस्तू खरेदी,नव व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या तर त्या शुभ मानल्या जातात.
याच दिवसापासून राम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाला सुद्धा सुरवात होते.
गुढीपाडवा या हिंदुनववर्षाच्या दिवसाबद्दल काही आख्याइका सांगितल्या जातात त्या खालील प्रमाणे :
१) सृष्टीचे निर्माते ब्रह्मदेव यांनी याच दिवशी सृष्टिची निर्मिती केली असे मानले जाते.
२) लंकाधिपती रावणाचा पराभव करून व १४ वर्षाचा वनवास संपवून याच दिवशी प्रभू श्रीराम अयोध्येत परत आले.
३) गौतमीपुत्र सातकर्णी अर्थात शालिवाहन राजा याचे व शकांचा राजा नहपान यांचे नाशिक येथील गोवर्धन येथे युद्ध झाले व यात शक राज्य नहपान मृत पावला.
या विजयाचे प्रतीक म्हणून शालिवाहन शक या हिंदू कालगणनेची सुरुवात केली जी आज अजूनही आपण वापरतो या हिंदू कालगणनेचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा.(gudhipadwa)
४) माता पार्वती व भगवान शंकराचे लग्न पाडव्यादिवशी ठरले.
चैत्र शुद्ध प्रतिपदेला सर्वजण सकाळी लवकर उठतात. स्नान करतात नवीन वस्त्र परिधान करून तयार होतात,त्यानंतर सर्वजण मिळून घराच्या प्रवेशद्वारी उंच गुढी उभारतात.
उंच बांबूला कडूनिंबाची डहाळी,बांबूच्या वरच्या टोकाला रेशमी वस्त्र अथवा साडी गुंडाळतात, फुलांचा हार आणि साखरेच्या गाठी बांधून त्यावर तांब्याचे भांडे बसवले जाते, गुढी बांबूच्या पाटावर उभा केली जाते, तयार केलेली गुढी दारात बांधतात.
गुढीला गंध ,फुले,अक्षता वाहतात व निरांजन लावून उदबत्ती दाखवतात.
दुपारी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून संध्याकाळी पुन्हा हळद-कुंकू फुले वाहून गुढी उतरवली जाते.
महाराष्ट्रात गुढीपाडव्याच्या दिवशी हिंदू संस्कृृतीची झलक दाखविणाऱ्या विविध मिरवणुका काढल्या जातात.ज्यामध्ये महिला, पुरुष, लहान मुले पारंपरिक पोशाखांत या मिरवणुकीत सहभागी होत असतात.
शिमगा सणाच्या काळात भेदभाव टाकून स्वीकारलेली समता फार काळ टिकू शकत नाही. त्यामुळे अव्यवस्था निर्माण होते. ही भेदभाव निर्माण करणारी अव्यवस्था संपवून पुन्हा व्यवस्था निर्माण करण्यास आरंभ करण्याचा दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा.(gudhipadwa)
या दिवसापासून पुन्हा देव, ऋषी, पितर, मनुष्य आणि भूत यांची पूजा करायला आरंभ करायचा, त्यांचे आशीर्वाद मिळवायचे आणि आपापली कर्तव्यकर्मे करायला आरंभ करायचा दिवस हाच पाडवा साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश आहे.
गुढीपाडवा ला कडुलिंबाची कोवळी पाने अणि फुले, मिरे, हिंग, मीठ, कैरी, साखर अन् चिंच हे सर्व साहित्य एकत्र करून खातात ज्यामुळे पचनक्रिया सुधारणे, पित्तनाश दूर करणे, त्वचा रोग बरे करणे यासारखे आजार ठीक होतात.(gudhipadwa)