गौरी पूजन संपूर्ण माहिती चला वाचूया
गौरी पूजन पहिला दिवस
पहिला दिवस अगदी आनंदाने सुरू होतो. ह्या दिवशी सगळे अगदी उत्साहात आणि जोशात असतात .तसेच आस म्हंटल जाते परंपरेनुसार ज्या महिला गौरी घरात घेऊन येतात त्यांचे पाय दुध आणि कोमट पाण्याने धुतले जातात आणि त्यांचा पायावर कुंकाने स्वस्तिक काढलं जातं. एक महिला घराच्या दारापासून लक्ष्मीच्या पायांचे ठसे उमटवतात. मागून दुसरी महिला घरात येताना पावलांवरुन गौरींचे मुखवटे आणते. शंख घंटी वाजवून गौरीचं अगदी आनंदात घरात आगमन केलं जातं. लक्ष्मी आली सोन्याच्या पावलांनी… असे म्हणतात.
गौरी स्थापना करण्यापूर्वी त्यानं संपूर्ण घरात मिरवत घरातील समृद्धी, दुध-दुभत्याची जागा व इतर गोष्टी दाखविण्याची प्रथा असते. मग देवघरासमोर लक्ष्मीची आगमन करुन घरात ऐश्वर्य नांदो आणि वैभव निर्माण होवो, सुख- समृध्दी येवो अशी प्रार्थना केली जाते. त्या नंतर पारंपरिक रूढीप्रमाणे मूर्तीला साडी नेसवून, नटवून गौरीला अलंकारांनी सजवतात. गौर सजवल्यानंतर शुभ मुहूर्तात गौरी बसवितात.
गौरी पूजन दुसरा दिवस
दूसऱ्या दिवशी सगळे अगदी उत्साहात आणि जोशात असतात. दुसर्या दिवशी ज्येष्ठा नक्षत्रावर गौरींचे महापूजन होतं. या दिवशी पाना-फुलांची आरास करतात, शेवंतीची वेणी माळवतात. गजरा, हार, चाफ्याचे फूल, केवड्याचे पान वाहतात. गौरीची स्थापना झाल्यानंतर दुसर्या दिवशी ज्येष्ठ नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करतात व महानैवेद्य दाखवितात. अनेक ठिकाणी आपल्या परंपरेनुसार नैवेद्याचा फुलोरा तयार केला जातो.
माहेरवाशीण ज्येष्ठ गौरीला पुराणाचा नैवेद्य दाखवतात. माहेरी आलेल्या गौरीला विशिष्ट प्रकाराचे पदार्थ खाऊ घालण्याची पद्धत आहे. गौरींना वेगवेगळे फळे अर्पण केली जातात नसेच गोड पदार्थ देखील अर्पण केले जातातआणि धान्यांच्या राशी लावल्या जातात. नैवेद्याला १६ भाज्या, १६ कोशिंबिरी, १६ चटण्या, १६ पक्वान्ने तसेच फराळाचे पदार्थ करतात. पुरणाची १६ दिव्यांनी आरती करतात. संध्याकाळी हळदी-कुंकवाचा समारंभ केला जातो. अनेक जागी रात्री झिम्माफुगड्या, घागरी फुंकणे असे खेळ खेळून जागरण केले जाते.
गौरी विसर्जन तिसरा दिवस
तिसर्या दिवशी मूल नक्षत्रात गौरीचे खीर-कानवल्याचा नैवेद्य दाखवून विसर्जन करतात. या दिवशी कापसाचे गाठ बांधतात. सूतमध्ये हळद, कोरडे फळे, तमालपत्र, फुलं, झेंडूची पाने, काजूची फुलं, रेशीम धागा मिसळतात. गौरीची पूजन करुन आरती करतात नंतर परंपरेनुसार मुखवटे हालवण्यात येतात, खडे असलेल्या नदीत विसर्जन करून परत येताना नदीतील माती घरी आणून ती सर्व घरभर पसरवतात.अश्याप्रकारे गौरी चे विसर्जन केले जाते अगदी आनंदाने.
ज्येष्ठा गौरी आरती l Jyeshtha Gauri Aarti ll
भाद्रपद शुद्ध सप्तमीस प्रतिष्ठा
अनुराधा नक्षत्र ज्येष्ठा श्रेष्ठा
गणेशा सहित गौरी धनिष्ठा
बैसली येउनि सकळिया निष्ठा ||१||
जयदेव जयदेव जय महालक्ष्मी, श्रीमहालक्ष्मी,
कृपा करुनी आली तू महालक्ष्मी जयदेव जयदेव ।। धृ।।
ज्येष्ठा नक्षत्र पुजेचा महिमा
षडरस पक्वान्ने होती सुखधामा
सुवासिनी ब्राह्मण अर्पुनी निजनेमा
तुझे आशीर्वादे सकलही धामा ।।२।।
जयदेव जयदेव जय महालक्ष्मी, श्रीमहालक्ष्मी,
कृपा करुनी आली तू महालक्ष्मी जयदेव जयदेव ।। धृ।।
उत्थापन मूळावर होता अगजाई
वर देती झाली देवी विप्राचे गृही
रुद्र विश्वनाथ भक्ताचे ठायी
वर देती झाली देवी सकळांचे गृही ।।३।।
जयदेव जयदेव जय महालक्ष्मी, श्रीमहालक्ष्मी,
कृपा करुनी आली तू महालक्ष्मी जयदेव जयदेव ।। धृ।।