Site icon dnyankosh.in

गणपतीपुळे

गणपतीपुळे

गणपतीपुळे: एक मनमोहक पर्यटनस्थळ

गणपतीपुळे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यात वसलेले कोकण किनारपट्टीवरील सह्याद्रीच्या रांगांमधील हिरवीगार वनराई, स्वच्छ सुंदर रुपेरी समुद्रकिनारा तसेच आंबा, काजू, नारळ, पोफळी व वनस्पतींच्या हिरवळीने नटलेले एक प्रसिद्ध असे पर्यटनस्थळ आहे.

प्रत्येक प्रवाशाच्या बकेट लिस्टमध्ये हे ठिकाण का असावे हे माहिती करून घेण्यासाठी या लेखामध्ये आपण गणपतीपुळेविषयी सविस्तर माहिती घेऊया.

इतिहास आणि पौराणिक कथा:

कोकणातील प्रत्येक देवतांविषयी वेगवेगळ्या दंतकथा आहेत. अश्याच एका दंतकथेनुसार मोगल सम्राजच्यावेळी बाळंभटजी भिडे नावाचे एक ब्राह्मण या गावाचे खोत होते. मुघलानी आकारलेल्या विविध करामुळे त्याच्यावर आर्थिक संकट कोसळले होते.

दृढनिश्चयी स्वभावचे असलेले भिडे यांनी असा निश्चय केला की जोपर्यंत माझ्यावरचे संकट निवारण होत नाही तोपर्यंत मी अन्नग्रहण करणार नाही. असे बोलून केवड्याच्या बनात आराघ्य दैवत मंगलमूर्तीची उपासना करण्यासाठी निघून गेले.

काही दिवसानंतर भिडेंना असा एक दृष्टांत झाला की, “मी या ठिकाणी भक्तांच्या कामना परिपूर्ण करण्यासाठी आगरगुळे (गणेशगुळे) येथून दोन गंडस्थळे व दंतयुक्त स्वरुप धारण करुन प्रकट झालो आहे.

माझे निराकार स्वरुप डोंगर असून, तू माझी सेवा कर, अनुष्ठान कर, पूजा कर, तरच तुझे संकट दूर होईल.” त्याचवेळी भिडे यांची गाय काही दिवस दूध देत नव्हती, म्हणून गुराख्याने तिच्यावर बारीक लक्ष दिले असता, त्याला असे दिसले की सध्याच्या मूर्तीच्या जागी डोंगरावरील एका शिळेवर गायीच्या स्तनातून सतत दूधाचा अभिषेक होत आहे.

त्याने हा घडलेला प्रकार खोतांच्या कानावर घातला. त्याचवेळी त्यांना त्यांना पडलेला दृष्टान्त आठवला व त्यांनी तात्काळ त्या  सर्व परीसराची सफाई केली असता त्यांना दृष्टांतातील वर्णनाप्रमाणे गणेशाची मूर्ती आढळून आली. त्या ठिकाणी गवताचे छप्पर घालून त्यांनी छोटेसे मंदिर उभारले व त्या गणपतीच्या मूर्तीची पूजा करायला सुरवात केली. 

नैसर्गिक सौंदर्याने परिपूर्ण अशी भारताची पश्चिम किनारपट्टी असून याच किनारपट्टीवर रत्नागिरी जिल्ह्यात गणपतीपुळ्याचे प्रसिद्ध असे गणेशस्थान आहे. पेशवेकालीन अती प्राचीन असलेले हे मंदिर येथील श्रीगणेशाचे स्थान हे स्वयंभू आहे.

स्वयंभू म्हणजे ज्याना साकार रुपात आणावे लागत नाही. स्थापत्य म्हणून अथवा मूर्ती म्हणून त्यांना घडवावे लागत नाही. सृष्टीच्या जन्मावेळीच त्यांचा जन्म झालेला असतो, किवा त्या सृष्टी म्हणूनच जन्माला आलेल्या असतात.

पाचशे वर्षांपूर्वी या गावचे खोत असलेल्या बाळभटजी भिडे यांना या स्वयंभू साकार रुपाचा दृष्टांत झाला होता. त्यांनीच छप्पर उभारुन पहिली पूजा केली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सचीव आण्णाजी दत्तो यांनी गवताच्या छप्पराच्या जागी सुंदर घुमट बांधला. पुढे पेशव्यांचे सरदार गोविंपंत बुदेले यांनी मंदिराचा सभामंडप बांधला.

कोल्हापूर संस्थानात कारभारी असलेल्या माधवराव बर्वेनी त्यावर सोन्याचा मुलामा दिलेला घुमटाकार कळस चढविला. श्रीमंत नानासाहेब पेशव्यांनी नंदादीपाची, तर माधवराव पेशव्यांच्या पत्नी रमाबाई यांनी दगडी धर्मशाळा बांधली. आज दिसणाऱ्या मंदीराचे  बांधकाम सन १९९८ या कालावधीत सुरु झाले होते व ते २००३ साली पूर्ण झाले.
गणपतीपुळेचा समुद्रकिनारा हा महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक आहे. त्यामुळे वर्षभर देशभरातून हजारो पर्यटक या ठिकाणाला भेट असतात. गणपतीपुळेला सुमारे १२ कि.मी. चा पांढऱ्या वाळूचा अतिशय स्वच्छ असा समुद्रकिनारा लाभला आहे.

जवळची पर्यंटनस्थळे:

१) कवी  केशवसुत स्मारक:
आद्य मराठी कवी आधुनिक मराठी काव्याचे जनक कृष्णाजी केशव दामले यांचे जन्मगाव मालगुंड हे गांपाटिपुले मंदिरापासून फक्त ३.५ कि. मी. अंतरावर आहे. येथे असलेल्या त्याच्या मूळ घराचे स्मारकामध्ये रूपांतर करण्यात आले.यामध्ये  ग्रंथालय, वाचनालय व अभ्यासिका, प्रसिद्ध मराठी कवींच्या कविता,प्रसिद्ध कवींचा परिचय करुन देणारे फलक, काव्यसंर्भालय आदी प्रर्शनीय स्वरुपात मांडलेले आहे.

२) किल्ले जयगड:
१६ व्या शतकात विजापूरकरानी बांधलेला हा किल्ला गणपतीपुळे पासून २०कि. मी. अंतरावर आहे. हा किल्ला आज ही सुस्थितीत असून तटबंदीवरून किल्ल्याला मस्त फेरफटका मारता येतो. 

किल्ल्याला समुद्राच्या बाजुने अगदी पाण्यालगतही तटबंदी आहे. बाहेरच्या सर्व बाजुने खडकाळ भाग असून त्यावर सतत पाण्याच्या लाटा आपटत असतात. किल्ल्यावरील टेहळणी बुरुजावरुन सूर्यास्तचे मनमोहक असे दर्शन होते.

३) थिबा पॅलेस:
ब्रिटीशांनी ब्रह्मदेश (म्यानमार) जेव्हा जिंकून आपल्या ताब्यात घेतला तेव्हा ब्रह्मदेशाचा राजा  थिबा मिन याला आपल्या ताब्यात ठेवले होते. प्रजेशी त्याचा कोणता ही  संबंध राहु नये यासाठी ब्रिटीशांनी त्याला भारतात आणून रत्नागिरी मध्ये बंदिवान म्हणुन ठेवले होते, व इथेच त्याचा मृत्यू झाला.

थिबा पॅलेस हे रत्नागिरीतले प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. गणपतीपुळे पासून २५ कि. मी अंतरावर आहे. सुंदर बांधकाम असलेला हा तीन मजली वाडा सध्या एक प्रादेशिक वस्तुसंग्रहालय आहे. या राजवाड्यात थिबा राजाने वापरलेल्या काही गोष्टी अजूनही जतन करून ठेवलेल्या आहेत.

४) लोकमान्य टिळक जन्मस्थान:
स्वातंत्र्य चळवळीतील प्रसिद्ध थोर स्वातंत्र्यसेनानी लोकमान्य टिळक यांचा जन्म येथे २३ जुलै १८५६ रोजी याच घरात झाला होता. 

दहा वर्षांचे होईपर्यंत येथे त्यांचे वास्तव्य होते. सध्या हे घर महाराष्ट्र राज्याच्या पुरातत्व व वस्तुसंग्रहालयाचे विभागाचं कार्यालय असून  लोकमान्य टिळक यांच्या मूळ वापरात असलेल्या काही जुन्या वस्तू तसेच त्यांचे काही जुने फोटो येथे पाहायला मिळतात. गणपतीपुळे पासून २२ कि. मी अंतरावर आहे

कसे पोहोचाल?

१) रेल्वे :
श्री क्षेत्र गणपतीपुळे देवस्थान रत्नागिरी रेल्वे स्थानकापासून ३० कि. मी. अंतरावर आहे. सर्व प्रकारच्या एक्सप्रेस रेल्वे रत्नागिरी रेल्वे स्थानकावर थांबतात.

२) रस्ते :
श्री क्षेत्र गणपतीपुळे देवस्थान रस्ते मार्गाने मुंबई-गोवा महामार्गाशी जोडलेले असून महाराष्ट्रामधील मुख्य शहरामधून तेथे जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात बस उपलब्ध असतात.

भेट सर्वोत्तम वेळ : 

हिवाळा (ऑक्टोबर ते फेब्रुवारी):
गणपतीपुळेला भेट देण्यासाठी हा सर्वोत्तम काळ मानला जातो. या महिन्यांतील हवामान आल्हाददायक आणि थंड असते, तापमान 20°C ते 30°C पर्यंत असते. समुद्र सामान्यतः शांत असतो, ज्यामुळे तो पाण्याच्या खेळांसाठी आणि समुद्रकिनार्यावर फिरण्यासाठी योग्य बनतो.

मान्सूननंतर (सप्टेंबर आणि ऑक्टोबरच्या सुरुवातीस):
पावसाळ्यानंतर, लँडस्केप हिरवेगार आणि हिरवेगार होते आणि हवामान अधिक आल्हाददायक होऊ लागते. हिवाळ्यातील गर्दीच्या आगमनापूर्वी भेट देण्यासाठी हा कालावधी देखील चांगला आहे.

उन्हाळा (मार्च ते मे):
गणपतीपुळे मधील उन्हाळा खूप उष्ण आणि दमट असू शकतो, तापमान अनेकदा 30°C पेक्षा जास्त असते. जर तुमची उष्णतेची हरकत नसेल, तरीही तुम्ही समुद्रकिनाऱ्याचा आनंद घेऊ शकता, परंतु उबदार हवामानासाठी तयार रहा.

मान्सून (जून ते सप्टेंबर):
मुसळधार पाऊस, जोरदार वारे आणि खडबडीत समुद्र यासह, गणपतीपुळे येथे पावसाळा खूप तीव्र असू शकतो. आरामशीर समुद्रकाठच्या सुट्टीसाठी ही सर्वोत्तम वेळ नाही, परंतु जर तुम्ही पावसाळी वातावरणाचा आनंद घेत असाल तर हा एक मनोरंजक अनुभव असू शकतो.

Exit mobile version