रत्नागिरी जिल्ह्यातील तालुकाचे ठिकाण असणारे दापोली हे थंड हवेचे ठिकाण असून याला महाराष्ट्राचे मिनी महाबळेश्वर म्हणून सुद्धा ओळखले जाते.(dapoli)
dapoli
ब्रिटिश काळामध्ये येथे कॅम्प ची स्थापना करण्यात आली होती. त्यामुळे ब्रिटिश काळात हे गाव ‘’कॅम्प दापोली’’ म्हणून ओळखले जात असे.
या ठिकाणी महाराष्ट्र सरकारचे बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ असून जर तुम्ही या ठिकाणी जाणार असाल तर त्याला आवर्जून भेट द्या. १९७२ मध्ये स्थापन करण्यात आलेले हे विद्यापीठ भारतातील सर्वात मोठे कृषी विद्यापीठ आहे.
निसर्गाचे वरदान लाभलेल्या या शहराचे सौंदर्य पर्यटकांसाठी नेहमीच भुरळ घालणारे ठरलेले आहे. त्यामुळे वर्षभर येथे पर्यटकांची वर्दळ असते.(dapoli)
दापोली तालुक्याला अंदाजे ५० कि.मी चा समुद्रकिनारा लाभलेला आहे. येथील वातावरण वर्षभर थंड असते यामुळे याला महाराष्ट्राचे मिनी-महाबळेश्वर म्हणून सुद्धा ओळखले जाते.
स्वच्छ व सुंदर समुद्र किनारे, मधूनच होणारे डॉल्फिन चे दर्शन हिवाळया मध्ये येणारे स्थलांतरित ‘सी गल’ पक्षी, किनाऱ्यावर भरणारा मासोळीचा बाजार, ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा लाभलेल्या इमारती, ऐतिहासिक गड-किल्ले यासाठी प्रसिद्ध असलेल्या या ठिकाणाला एकदा अवश्य भेट दया.(dapoli)
जवळील पर्यटन स्थळे :
१) श्री केशवराज मंदिर: साधारण ५००० वर्ष जूने असलेले हे मंदिर आसुद या गावी असून हे मंदिर पांडवानी एका रात्रीत बांधले अशी आख्यायीका आहे. दापोली पासून हे मंदिर अंदाजे १४ कि. मी. अंतरावर आहे.भगवान विष्णु ला समर्पित असलेले हे मंदिर असून येथे गणपतीची सुद्धा मूर्ती आहे. मंदिराच्या परिसरात असलेल्या गाईमुखातून वर्षभर बाहेर येणारे स्वच्छ व गोड पाणी हे येथील आकर्षणाचे मुख्य केंद्रबिंदू आहे.(dapoli)
२) कड्यावरचा गणपती: दापोली पासून अंदाजे २६ कि. मी अंतरावर असलेल्या आंजर्ले या ठिकाणी हे प्राचीन मंदिर असून या मंदिराच्या स्थापणेबाबत अनेक कथा असल्या तरी खात्रीशीर माहिती देणारी कागदपत्रे आज उपलब्ध नाहीत. मंदिराचा आवार विस्तीर्ण असून यामध्ये गणपती व शंकराची मंदिरे आहेत. माघी महिन्यात साजरा केला जाणारा गणेशोत्सव हा येथील महत्वाचा गणेशोत्सव असतो.
३) सुवर्णदुर्ग किल्ला: हर्णे बंदराजवळ असलेला हा समुद्री किल्ला दापोली पासून १६ कि.मी. अंतरावर आहे. हर्णे बंदरावरून किल्ल्यावर जाण्यासाठी अंदाजे २० मिनिट लागतात. किल्ल्याचा मुख्य दरवाजा प्रशस्त असून पायरीवर कासवाची प्रतिमा कोरलेली आहे. किल्ल्यावर बघण्यासाठी राजवाड्याचे चौथारे, धान्य कोठारे, पाण्याचे टाके असून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसून सोबत पाणी घेऊन जावे.(dapoli)
४) उन्हवरे: गरम पाण्याच्या झऱ्यासाठी प्रसिद्ध असलेले हे ठिकाण शहरापासून ३० कि.मी. अंतरावर आहे. या पाण्यामध्ये गंधकाचे प्रमाण जास्त असल्यामुळे जर येथे अंघोळ केली तर त्वचेचे आजार बरे होतात. वर्षभर येथे गरम पाणी वाहत असते, यामुळे वर्षभर येथे पर्यटकाची गर्दी दिसून येते.
५) श्री चंडिकादेवी मंदिर: दापोली पासून २६ कि.मी. अंतरावर असलेल्या दाभोळ येथे चंडिकादेवीचे मंदिर आहे. हे जागृत देवस्थान असून एका टेकडीवर असलेल्या प्राचीन गुहेत हे मंदिर आहे. नवरात्रीमध्ये येथे देवीचा उत्सव मोठ्या धामधुमी मध्ये साजरा केला जातो. देवीची मूर्ती काळ्या पाषाणामध्ये कोरलेली आहे.
दापोली ला कसे पोहचाल:
रस्ते मार्ग: दापोली ते मुंबई हे साधारण २२५ कि. मी. अंतर तर पुणे ते दापोली हे १९० कि. मी असून जे अंदाजे ६ ते ७ तासात सहज पार केले जाते. मुंबई व पुणे वरुन येथे जाण्यासाठी राज्य परिवहन मंडळाच्या बस उपलब्ध आहेत .या ठिकाणी जाण्यासाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे.(dapoli)
रेल्वे मार्ग: दापोलीला जाण्यासाठी तुम्हाला कोंकण रेल्वेच्या खेड रेल्वे स्थानकावर उतरावे लागते येथून दापोली ३० कि. मी. अंतरावर आहे. खेड वरुन हे अंतर येथे सहज उपलब्ध असलेल्या ऑटो रिक्षा, लोकल बसचा वापर करून सहज पार करता येते.
हवाई मार्ग: सर्वात जवळील विमानतळ रत्नागिरी असून हे १४० कि. मी. अंतरावर आहे
दापोली मध्ये राहण्यासाठी काही हॉटेल्स:
सी पॅराडाईज बीच रिसॉर्ट दापोली: हे हॉटेल येथील स्वस्त निवासस्थान शोधणाऱ्या पर्यटकांसाठी एक उत्तम पर्याय आहे. हे मुरुड बीचवर आहे. हे हॉटेल अत्यंत शिफारस केलेल्या हॉटेलपैकी एक आहे.
सागर सावली ग्रँड: करडे बीचच्या अगदी समोर असलेल्या ह्या हॉटेलचे स्थान उत्तम आहे. संपूर्ण रिसॉर्टचा वातावरण खूप छान आहे. सुविधांमध्ये पार्किंग, पूल, बाहेरचे जेवण इत्यादींचा समावेश आहे.
बीच रिसॉर्ट इग्लू हाऊस : सर्वात आश्चर्यकारक आणि अद्वितीय गोष्ट म्हणजे इग्लू शैलीची रचना, स्वच्छ कॉटेज असलेल्या प्रशस्त खोल्या, उत्तम वातावरण आणि सेवा येथे दिली जाते.(dapoli)
ड्रीमलँड इन : अरबी समुद्राच्या जवळ असलेल्या समुद्रकिनाऱ्यावरील मालमत्तेवर, पामच्या झाडांनी वेढलेले हे माफक हॉटेल कर्दे बीचपासून 2 किमी आणि सुवर्णदुर्गपासून 6 किमी अंतरावर आहे.