महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर वसलेले अलिबाग हे शहर शहरी जीवनातील थकवा विरंगुळा घालवण्यासाठी एक सर्वोत्तम समुद्रकिनारी शहर आहे.(alibag)
मुंबई शहराच्या अगदी खाली असलेले अलिबाग हे शहर एक लहान किनारपट्टीचे शहर असून अलिबाग या शब्दाचा अर्थ ‘अलीची बाग’ असा होतो. फार प्राचीन काळी अली या इस्रायली पर्यटकांनी लावलेल्या फळांच्या भागांचा हा संदर्भ आहे जो प्राचीन काळी या शहरात राहत असे.निसर्गरम्य समुद्र किनारे तोंडाला पाणी आणतील असे खाद्यपदार्थ पदार्थ मजा मस्ती आणि विश्रांतीसाठी उपलब्ध असलेल्या अनेक संधी यामुळे अलिबाग हे पर्यटकांसाठी एक सोयीस्कर ठिकाण आहे.
alibag
समुद्र जवळ असलेल्या त्याच्या सोयीच्या स्थानामुळे ब्रिटिश राजवटीत अलिबाग या शहराला एक वेगळीच ओळख मिळालेली होती. हे शहर समुद्रकिनारी असल्यामुळे अलिबागचा सौंदर्यात एक वेगळीच पार पडते चकचकीत सोनेरी काळी वाळू आणि स्वच्छ निळ्या लाटा, स्वच्छ शहर आणि चमचमणारे किनारे यामुळे याच्या सौंदर्यात अधिकच भर पडते.(alibag)
जर तुम्ही समुद्रप्रेमी असाल किंवा इतिहास प्रेमी असाल तर अलिबाग हे ठिकाण तुमच्यासाठी एक परिपूर्ण असे पर्यटन स्थळ आहे.
अलिबाग येथून जवळ असलेले समुद्र किनारी म्हणजे अलिबागचा समुद्र किनारा, मांडवाचा समुद्र किनारा किंवा नागावचा समुद्रकिनारा हे येथील प्रसिद्ध समुद्रकिनारी आहेत येथे तुम्ही तुमच्या कुटुंबासह किंवा मित्र-मैत्रिणींचा संपूर्ण दिवस घालवू शकता येथील समुद्रकिनाऱ्यांवर विविध प्रकारच्या वॉटर स्पोर्ट्स सुद्धा केले जातात जसे की पॅरासेलिंग, जेटस्कीग, कायकिंग यासारख्या वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी येथे केल्या जातात
अलिबाग मध्ये तुम्ही बीच साईड कॅम्पिंगचा सुद्धा अनुभव घेऊ शकता (alibag)
अलिबाग मधील उन्हाळा सामान्यतः उष्ण आणि दमट असतो पावसाळ्यातील महिने थंड आणि अल्हाददायक असतात तर येथील हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान असतो. सामान्यपणे येथे भेट देण्याचा सर्वोत्तम काळ हा हिवाळा मानला जातो. अलिबाग मध्ये पाऊस साधारणपणे जुलै ते सप्टेंबर या महिन्यात होतो तरी हिवाळ्यातील महिने हे कोरडे असतात..
अलिबाग मध्ये भेट देण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणे:
१) अलिबाग बीच: अलिबाग मध्ये असलेल्या प्रमुख आकर्षणांपैकी एक म्हणजे अलिबागचा समुद्र किनारा आहे. समुद्रकिनारी असलेल्या पिवळ्या वाळूमुळे समुद्रकिनाऱ्याच्या सौंदर्यात विशेष बर पडते. येथे तुम्ही तुमचा वेळ निवांत बसून घालू शकता. येथे काही वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी सुद्धा उपलब्ध आहेत. समुद्रकिनाऱ्याजवळच असलेले चारशे वर्ष जुने गणेश मंदिर हे देखील एक येथील आकर्षणाचे केंद्र आहे.(alibag)
२) कोलाबा किल्ला: अरबी समुद्रात असलेला हा किल्ला शिवाजी महाराजांच्या काळातील असून तीनशे वर्षाहून अधिक जुना किल्ला आहे या किल्ल्यावर अजूनही तोफ तटबंदी यांचे मूळ अवशेष जतन केलेले आहेत. किल्ला जरी सर्व बाजूंनी पाण्याने वेढलेला असला तरी कमी भरतीच्या वेळी पायीच किल्ल्यात जाता येत असे तर मोठ्या भरतीच्या वेळी पर्यटकांना कुलाबा किल्ल्याला जाण्यासाठी बोटी भाड्याने घ्याव्या लागतात किल्ल्यामध्ये अठराव्या शतकातील गणपती मंदिर सुद्धा आहे
किल्ला भेट देण्याची वेळ सकाळी दहा ते संध्याकाळी पाच पर्यंत आहे. येथे पर्यटन शुल्क आकारले जाते जे प्रति व्यक्ती पाच रुपये आहे.
३) ब्रह्मा कुंड: सतराव्या शतकात बांधलेले हे कुंड अलिबाग मधील सर्वात ऐतिहासिक आकर्षणांपैकी एक प्रमुख आकर्षण आहे. पौराणिक कथा नुसार भगवान ब्रह्मदेवाने एकदा येथे पाण्यात डुबकी मारली होती त्यामुळेच याचे नाव ब्रह्मा कुंड असे पडले हे कुंड आयताकृती आकाराच्या असून चारही बाजूने कुंडल जाण्यासाठी पायऱ्या आहेत येथे भेट देण्याची वेळ सकाळी आठ ते संध्याकाळी सहा अशी आहे(alibag)
४) मुरुड समुद्रकिनारा: मुरुड समुद्रकिनारा हा काळया वाळूचा समुद्रकिनारा असून तो त्याच्या प्रसन्न आणि शांत वातावरणासाठी ओळखला जातो. येथून जवळच मुरुड जंजिरा हा समुद्री किल्ला असून येथे बोटीने सहज जाता येते.
५) अलिबाग चुंबकीय वेधशाळा: संपूर्ण जगात असलेल्या एकूण 13 चुंबकीय वेधशाळांपैकी ही एक आहे ही वेधशाळा अलिबाग शहराची शान आहे जी ब्रिटिश राजवटीत स्थापन करण्यात आलेली होती या वेधशाळेच्या तो इमारती असून एका इमारतीत भूचुंबकीय उपकरणे तर दुसऱ्या इमारतीत अचूक रेकॉर्डिंग उपकरणे आहेत
येथे भेट देण्याची वेळ सकाळी दहा ते संध्याकाळी पाच पर्यंत आहे
६) आवास समुद्रकिनारा: आवाज समुद्रकिनारा हा अलिबाग मधील सर्वात स्वच्छ व सुंदर किनाऱ्यांपैकी एक आहे. येथे फार थोड्या प्रमाणात पर्यटक भेट देत असतात त्यामुळे शांतता प्रिय लोकांसाठी हे एक आकर्षणाचे पर्यटन स्थळ आहे.(alibag)
७) नागाव समुद्रकिनारा: सुपारी आणि ताडांच्या झाडांनी भरलेला हा समुद्रकिनारा अलिबाग मधील सर्वात लोकप्रिय समुद्र किनाऱ्यांपैकी एक आहे. या समुद्रकिनाऱ्यावरील वाळू ही सोनेरी रंगाची आहे. नागाव समुद्रकिनाऱ्यावर तुम्ही स्पोर्टस ऍक्टिव्हिटीज जसे की जेट स्कीन पॅरासेलिंग बनाना राईड यासारखे अनेक ऍक्टिव्हिटीज करू शकता त्याचप्रमाणे उंट राईड सुद्धा करू शकता.
अशीच नवनवीन माहिती वाचण्यासाठी येथे CLICK करा.
अलिबागला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ:
अलिबागला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे हिवाळ्याच्या काळात, नोव्हेंबर ते फेब्रुवारी महिन्यांदरम्यान. या वेळी, येथील हवामान थंड आणि आल्हाददायक राहते, ज्यामुळे प्रेक्षणीय स्थळाना भेट देण्याच्या भरपूर संधी उपलब्ध होतात. यावेळी हवामान कोरडे राहते, त्यामुळे समुद्रकिनारे पाहण्यासाठीसुद्धा हा एक उत्तम काळ आहे.(alibag)
अलिबागला कसे पोहचाल:
फेरीद्वारे: मुंबईहून अलिबागला पोहोचण्याचा जलद मार्ग म्हणजे गेटवे ऑफ इंडिया बंदरातून मांडवा जेट्टीपर्यंत फेरीने. मांडवा जेट्टीवरून बसने अलिबागला जाता येते. संपूर्ण प्रवासाला सुमारे एक तास लागतो आणि दोन शहरांमध्ये फेरी नियमित अंतराने चालू असतात.
रस्त्याने: अलिबाग हे मुंबई-पुणे महामार्गाने मुंबईशी जोडलेले आहे. पुणे व मुंबई या दोन्ही ठिकाणांदरम्यान गाडीने जाण्यासाठी सुमारे चार तास लागतात. दोन ठिकाणांदरम्यान राज्य परिवहन मंडळाच्या नियमित बसेसही धावतात.(alibag)
रेल्वेने: अलिबाग पासून सर्वात जवळील रेल्वे स्थानक पेण असून अलिबाग पासून हे २९ किलोमीटर अंतरावर आहे.
One Comment