verul leni | वेरूळ लेणी

verul leni

वेरूळ लेणी भारतीय स्थापत्यशास्त्रातील एक अद्भुत नमुना आहे. या लेणी महाराष्ट्र मधील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये असून शहरापासून अंदाजे 30 कि. मी अंतरावर आहेत. सातमाळा डोंगररांगेच्या कडेकपारित कोरलेल्या साधारणतः पाचव्या ते दहाव्या शतकाच्या कालखंडात कोरलेल्या एकूण ३४ लेणी असून, यामध्ये १२ बौद्ध, १७ हिंदू आणि ५ जैन लेणी आहेत.(verul leni)

द्रविडी शैलीचे अद्भुत नमूना असलेले कैलास मंदिर येथेच असून या मंदिराचे बांधकाम राष्ट्रकूट राजवंशाचे राजे नरेश कृष्ण प्रथम याच्या कालखंडात करण्यात आलेले आहे.

वेरूळ लेणी(verul leni)

या मंदिराचे वैशिष्ट म्हणजे हे मंदिर वरून खाल्ली याप्रकारे कोरण्यात आले आहे.२७६ फूट लांब, १५४ फूट रुंद असे हे मंदिर असून या मध्ये खुल्या मंडपात समोर नंदी आणि विशाल हत्ती आणि स्तंभ आहेत.

वेरूळ लेणी

भारत सरकारच्या पुरातत्त्व विभागाने १९५१ साली या लेण्याना राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले तर यूनेस्कोने १९८३ साली या लेण्याचा जागतिक वारसास्थळांच्या यादीत याचा समावेश केला.(verul leni)

पाचव्या ते दहाव्या शतकाच्या कालखंडात कोरलेल्या या लेण्या असून येथे असलेल्या कैलास मंदिराची निर्मिती राष्ट्रकूट राजवंशाचे राजे नरेश कृष्ण प्रथम याच्या कालखंडात करण्यात आलेले आहे.

वेरूळ लेणी

पूर्वीपासून हा लेणी समूह व्यापारी मार्गावर असल्यामुळे अनेक परदेशी प्रवासी अभ्यासकांनी भेट दिल्याच्या नोंदी इथे आढळून येतात या मध्ये अरब प्रवासी अल-मस-उदी, बहामनी सुलतान गंगू ,फिरिस्टा, मालेट यांनी भेट दिल्याची नोंद आढळून येते.भारतात ब्रिटीश राजवट असताना या लेणी समूहाकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष झाले त्यामुळे येथील मूर्तीचे मोठे नुकसान झाले परंतु ब्रिटिशनी काळजी घेण्याचा प्रयत्न केल्याचे जुन्या नोंदीमद्धे आढळून येते.

लेणी पाहण्याची वेळ(verul leni):

पर्यटकाना पाहण्यासाठी या लेणी मंगळवार सोडून बाकी दिवस चालू असतात. तर मंगळवारी बंद असतात.या लेणी सकाळी ६:०० ते संध्याकाळी ६:०० पर्यंत पर्यटकांसाठी खुल्या असतात

पर्यटन शुल्क:

भारतीयांसाठी ४० प्रति व्यक्ती
सार्क देशांतील अभ्यागतांसाठी ४० प्रति व्यक्ती
विदेशी पर्यटकांसाठी ६००  प्रति व्यक्ती
व्हिडिओ कॅमेरासाठी २५ (verul leni)
कारसाठी पार्किंग शुल्क 30

कसे पोहचाल:

वेरूळ लेणी ह्या छत्रपती संभाजीनगर शहराजवळ असून वेरूळ लेणी ते छत्रपती संभाजीनगर हे अंतर ३२ कि. मी आहे.

वेरूळ पासून सर्वात जवळील रेल्वे स्थानक २८ कि. मी अंतरावर छत्रपती संभाजीनगर हे आहे.(verul leni)

वेरूळ पासून सर्वात जवळील विमानतळ छत्रपती संभाजीनगर हे असून ते वेरूळ लेणी पासून ३५ कि. मी अंतरावर आहे.

भेट देण्यासाठी योग्य वेळ:

वेरूळ लेणी समूहाला भेट देण्याची योग्य वेळ म्हणजे हिवाळ्याच्या महिन्यांत ऑक्टोबर ते मार्च हा कालावधी होय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *