भारत देश हा विविधता आणि प्राचीन अश्या पवित्र मंदिरांनी नटलेला देश आहे. जिथे लोक विविध देवाची पूजा करतात. येथे अनेक प्राचीन तसेच पवित्र मंदिरे आहेत. त्यापैकी एक म्हणजे देवांचे देव भगवान शंकर.(12 jyotirling)
12 jyotirling
भारतामध्ये शिव मंदिराची संख्या अफाट आहे व अनेक भक्त दरवर्षी लाखोंच्या संख्येने या शिव मंदिरांना भेट देत असतात. भारतात या मंदिरांपेकी महादेवाची १२ ज्योतिर्लिंग देखील आहेत.हिंदू धर्मशास्त्राने या ज्योतिर्लिंगांच्या यात्रेचा एक क्रम सांगितला आहे, तो खालीलप्रमाणे:
सौराष्ट्रे सोमनाथंच श्रीशैले मल्लिकार्जुनम्। उज्जयिन्यां महाकालमोङ्कारममलेश्वरम् ॥१॥
परल्यां वैद्यनाथंच डाकिन्यां भीमशंकरम्। सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावने ॥२॥
वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमीतटे। हिमालये तु केदारं घृष्णेशंच शिवालये ॥३॥
एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातः पठेन्नरः। सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति ॥४॥
सोमनाथ (गुजरात)
मल्लिकार्जुन (आंध्रप्रदेश)
महाकालेश्वर (मध्यप्रदेश)
ओंकारेश्वर (मध्यप्रदेश)
वैजनाथ (महाराष्ट्र)
भीमाशंकर (महाराष्ट्र)
रामेश्वर (तामिळनाडू)
औंढा नागनाथ हिंगोली, (महाराष्ट्र)
विश्वेश्वर (उत्तर प्रदेश)
त्र्यंबकेश्वर (महाराष्ट्र)
केदारनाथ (उत्तराखंड)
घृष्णेश्वर (महाराष्ट्र)
१) सोमनाथ (सौराष्ट्र, गुजरात):
सोरटी सोमनाथ हे १२ ज्योतिर्लिंग पैकी एक आहे. हे मंदिर गुजरातच्या सौराष्ट्र प्रदेशातील वेरावळ जवळ प्रभास पाटण येथे समुद्रकिनाऱ्यालगत असून भगवान शिवाच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी ते पहिले मानले जाते व हिंदूच्या पवित्र तीर्थस्थळांपेकी एक आहे.
हिंदू धर्मशास्त्रानुसार सोमनाथ या शब्दाचा अर्थ “सोमचा देव” किंवा “चंद्र”.या जागेला प्रभासा (“वैभवाचे स्थान”) असेही म्हणतात. गुजरातमधील द्वारका, ओडिशातील पुरी, तामिळनाडूमधील रामेश्वरम आणि चिदंबरम यासह भारताच्या समुद्रकिनाऱ्यावरील पाच सर्वात प्रतिष्ठित स्थळांपैकी हे एक आहे.(12 jyotirling)
या मंदिरावर अनेक वेळ परकीय आक्रमण झाले व अनेक वेळ हे मंदिर पाडण्यात आले. सध्या येथे असलेले हे मंदिर भारत स्वातंत्र झाल्यानंतर बांधण्यात आलेले आहे. हे मंदिर मारू-गुर्जरा या स्थापत्यशैली मध्ये बांधण्यात आलेले आहे.
कसे पोहचाल:
१) रस्तेमार्ग: सोमनाथ हे वेरावळ पासून ५ कि. मी अंतरावर आहे, अहमदाबाद पासून ४०८ कि. मी अंतरावर आहे. संपूर्ण गुजरात राज्यामधून येथे येण्यासाठी राज्य परिवहन मंडळाच्या बस उपलब्ध असतात.
२) रेल्वेमार्ग: सोमनाथ पासून सर्वात जवळील रेल्वे स्थानक वेरावळ असून जे अहमदाबाद तसेच इतर रेल्वे स्थानकांसोबत चांगल्या प्रकारे जोडलेले आहे.
३) हवाइमार्ग: केशोड हे सोमनाथ पासून सर्वात जवळील विमानतळ असून सोमनाथ पासून ते ५३ कि. मी अंतरावर आहे.
२) मल्लिकार्जुन (श्रीशैलम् आंध्र प्रदेश):
श्रीशैलम् मल्लिकार्जुन हे १२ ज्योतिर्लिंग पैकी दुसऱ्या क्रमांकाचे ज्योतिर्लिंग आहे. हे मंदिर हैदराबाद शहरापासून सुमारे २३० कि. मी अंतरावर नलला मलाई डोंगररांगेत वसलेले हे तीर्थस्थळ आहे.
या मंदिराचा इतिहास सातवाहण काळापासून सापडतो. चौदाव्या शतकातील राजा प्रोलयाचा काळ सुवर्ण काळ मानला जातो. जेव्हा भगवान शिव आणि पार्वतीने त्यांच्या मुलांसाठी योग्य वधू शोधण्याचा निर्णय घेतला. तेव्हा शिवाने रिद्धी (बुद्धी) आणि सिद्धी (आध्यात्मिक शक्ती) यांचा गणेशाशी विवाह केला.
परतताना कार्तिकेय रागावला आणि पलानी येथील क्रौंचा पर्वतावर एकटाच राहण्यासाठी निघून गेला. भगवान शिव व पार्वती त्याला शांत करण्यासाठी येत असल्याचे पाहून त्याने दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला, परंतु देवांच्या विनंतीनुसार, जवळच राहिले. शिव आणि पार्वती जिथे मुक्कामी होते ते ठिकाण श्रीशैलम म्हणून ओळखले जाऊ लागले.(12 jyotirling)
हिंदू पौराणिक कथेनुसार, लिंगाच्या रूपातील प्रमुख देवता (शिवाचे प्रतिकात्मक रूप) जस्मीन (स्थानिक भाषेत तेलुगुमध्ये मल्लिका म्हणून संबोधले जाते) ची पूजा केली जाते.
३) महाकालेश्वर (उज्जैन, मध्य प्रदेश):
१२ ज्योतिर्लिंग पैकी एक असलेले हे मंदिर मध्य प्रदेश येथील उज्जैन येथे आहे. सर्व तीर्थक्षेत्रांमध्ये भगवान शिवाचे सर्वात पवित्र स्थान मानले जाते.हे मंदिर पवित्र शिप्रा नदीच्या किनारी वसलेले आहे. महाकालेश्वराची मूर्ती दक्षिणाभिमुख आहे.
मध्य प्रदेश राज्यात दोन ज्योतिर्लिंगे आहेत, दुसरे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग हे महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दक्षिणेस अंदाजे १४० किमी अंतरावर आहे.
४) ओंकारेश्वर (मध्यप्रदेश):
१२ ज्योतिर्लिंग पैकी ४थ्या क्रमांकाचे हे ज्योतिर्लिंग असून मध्य प्रदेश येथील खांडवा जिल्ह्यात आहे. ॐकारेश्वराचा डोंगर नर्मदा नदीकाठी असून त्याचा आकार ॐ आकारासारखा आहे.(12 jyotirling)
हिंदू पौराणिक कथेनुसार, विंध्याचल पर्वतरागेवर नियंत्रण करणारी विंध्य देवता तिने केलेल्या पापांपासून स्वतःला क्षमा करण्यासाठी शिवाची पूजा करत होती.विंध्य देवतेच्या पूजेने शिव प्रसन्न झाले आणि ओंकारेश्वर आणि अमलेश्वर या दोन रूपांत प्रकट झाले असे मानले जाते. मातीचा ढिगारा ओमच्या रूपात प्रकट झाल्यामुळे हे बेट ओंकारेश्वर म्हणून ओळखले जाऊ लागले
५) वैजनाथ (महाराष्ट्र ) :
परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात असून हे १२ ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक आहे.हे मंदिर देवगिरीच्या यादव यांच्या काळात त्यांचे प्रधान हेमाद्री यांनी बांधले आहे. पुण्यश्लोक राणी अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा १७०० च्या सुमारास जीर्णोद्धार केला.
भव्य स्वरूपाचे असलेले हे मंदिर चिरेबंदी प्रकारात आहे.लांबलचक पायऱ्या व भव्य प्रवेशद्वार हे या मंदिराची वैशिष्ठ आहेत. बारा ज्योतिर्लिंगापैकी फक्त इथेच देवाला स्पर्श करून दर्शन घेत येते. मंदिराचा गाभारा व सभामंडप एकाच पातळीवर असल्यामुळे सभामंडपामधून सुद्धा दर्शन घेता येते.(12 jyotirling)
कसे पोहचाल:
१) रस्तेमार्ग: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नियमित बस येथे जाण्यासाठी विविध ठिकाणावरून उपलब्ध असतात.
२)रेल्वेमार्ग: जवळील रेल्वे स्थानक परळी असून येथून नियमित रेल्वे उपलब्ध असतात.
३) हवाइमार्ग: सर्वात जवळील विमानतळ छत्रपती संभाजीनगर विमानतळ असून परळी ते छत्रपती संभाजीनगर हे अंतर २२० कि. मी आहे.
६) भीमाशंकर (महाराष्ट्र):
भीमाशंकर हे १२ ज्योतिर्लिंग पैकी सहावे ज्योर्तिलिंग आहे. प्रचंड गर्द झाडी, जंगल व उंच डोंगर यांची निर्सगाने मुक्त हस्ताने उधळून करून या परिसराला सजवले आहे. सह्याद्रीच्या पश्चिकडील पसरलेल्या एका उंच डोंगरावर भीमाशंकर आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी असलेल्या भीमा नदीचा उगम येथेच होतो.
हेमाडपंथी शैली पद्धतीने बांधलेले हे मंदिर सुमारे १२०० ते १४०० वर्षांपूवीचे आहे. मंदिराच्या छतावर, खांबावर सुंदर नक्षीकाम केलेल्या मूर्ती आहेत. मंदिरात जाण्यासाठी डोंगर उतरून जावे लागते.
कसे पोहचाल:
१) रस्तेमार्ग: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नियमित बस येथे जाण्यासाठी विविध ठिकाणावरून उपलब्ध असतात.
२) रेल्वे मार्ग : भीमाशंकर येथून सर्वात जवळील रेल्वे स्थानक पुणे असून ते १२५ कि. मी अंतरावर आहे.
३) हवाइमार्ग: भीमाशंकर येथून सर्वात जवळील विमानतळ पुणे आहे.
७) रामेश्वर (तामिळनाडू) :
भारतातील बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी रामेश्वरममधील रामनाथस्वामी मंदिर हे एक ज्योतिर्लिंग असून, भारतातील एक लोकप्रिय आणि प्रमुख पर्यटन स्थळ सुद्धा आहे.
ज्याप्रमाणे उत्तर भारतात काशी ला मानले जाते त्याचप्रमाणे दक्षिण भारतात भगवान रामेश्वर ची पूजा केली जाते.मंदिराबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते जी भगवान रामाशी संबंधित आहे.
असे म्हंटले जाते की रावणाचा पराभव केल्यानंतर भगवान रामाने प्रायश्चित्त म्हणून भगवान शिवाची पूजा करायची होती. म्हणून त्यांनी हनुमानाला काशीहून एक लिंग आणायला सांगतले होते, पण जेव्हा हनुमानाने परत येण्यास उशीर केला तेव्हा माता सीतेने रेतीचा वापर करून शिवलिंग बनवले जेणेकरून राम आपली पूजा करू शकतील.(12 jyotirling)
असे मानले जाते की रामलिंगम म्हणून ओळखल्या जाणारे म्हणजे माता सीतेने तयार केलेले शिवलिंग ज्याची आता रामनाथस्वामी मंदिरात पूजा केली जाते. हनुमानाने कैलासातून आणलेले शिवलिंग म्हणजे विश्वलिंगम होय.
रामनाथस्वामी मंदिर त्याच्या आकर्षक रचना,शिल्पकला आणि नयनरम्य वास्तुशिल्प यासाठी ओळखले जाते. मंदिरात नंदीची मूर्ती देखील आहे, जी सुमारे १७.५ फूट उंच आहे.
कसे पोहचाल:
१) रस्तेमार्ग: रामेश्वरम बस स्थानक येथून फक्त २ कि. मी अंतरावर असून येथून नियमित राज्य परिवहन मंडळाच्या बस उपलब्ध असतात.
२) रेल्वे मार्ग: रामेश्वरम रेल्वे स्थानक येथून फक्त १ कि. मी अंतरावर आहे, जे कि भारतातील इतर शहरांशी चांगल्या प्रकारे जोडलेले आहे.
३) हवाइमार्ग : रामेश्वरम पासून सर्वात जवळील विमानतळ मदुरई असून ते रामेश्वरम पासून १८० कि. मी अंतरावर आहे.
८)औंढा नागनाथ हिंगोली (महाराष्ट्र) :
१२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले औंढा नागनाथ हे आठवे ज्योतिर्लिंग आहे.हेच ते अष्टम श्री नागेश्वर ज्योतिर्लिंग. पूर्वीच्या काळी या शहराला ‘दारुकावण’ म्हणून ओळखले जात असे.
या मंदिराला मोठा प्राचीन इतिहास असून अनेक आख्यायिका सुद्धा सांगितल्या जातात. असे मानले जाते कि इथे आधी पांडवकालीन मंदिर होते जे पांडवानी कौरवांकडून युद्ध हरल्यानंतर १२ वर्षाच्या वनवास काळात हे मंदिर बांधले होते.(12 jyotirling)
कालांतराने सध्या येथे असलेले हे मंदिर यादव घराण्याच्या काळात बांधण्यात आले होते जे कि सात मजली होते. जे औरंगजेबाने नंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात नष्ट केले.
सध्याचे असलेले मंदिर हे पुण्यश्लोक राणी अहिल्याबाई होळकर यांनी जिर्णोद्धार करून पुन्हा बांधलेले आहे. या मंदिराची उंची ६० फूट आहे.
दरवर्षी येथे माघ महिन्यात जत्रा भरते, जी फाल्गुन महिन्यापर्यंत चालते.
कसे पोहचाल:
१) रस्तेमार्ग: हिंगोलीपासून २४ कि. मी अंतरावर हे तीर्थक्षेत्र आहे.
२) रेल्वे स्थानक: जवळचे रेल्वे स्थानक हिंगोली हे असून ते भारतातील इतर शहरासोबत चांगल्या प्रकारे जोडलेले आहे.
३) हवाइमार्ग: जवळचे विमानतळ नांदेड हे असून हिंगोली पासून ते ७० कि. मी अंतरावर आहे.
९)विश्वेश्वर (उत्तर प्रदेश):
मंदिराचे शहर अशी ओळख असलेल्या भारतातील प्राचीन शहरांपेकी एक असलेले म्हणजे वाराणसी किवा काशी येथे हे मंदिर आहे. पवित्र अश्या गंगा नदीच्या किनाऱ्यावर वसलेले हे शहर असून येथे असलेले हे ज्योतिर्लिंग बारा ज्योतिर्लिंगपेेकी महत्वाचे ज्योतिर्लिंग आहे.
विश्वेश्वर या शब्दाचा अर्थ होतो कि “विश्वाचा शासक” तसेच येथे असलेले देवाला विश्वनाथ असे ही म्हणतात.
भगवान शंकर कैलासावर भस्म फासून राहत असत व त्यामुळे सर्वजण शंकराची टिंगल करावयाचे म्हणून पार्वतीने ‘मला कुणी चिडविणार नाही अश्या ठिकाणी घेऊन चला’ अशी विनंती भगवान शंकराला केली.त्यामुळे शंकर काशी येथे येउन राहू लागले. अशी आख्यायिका सांगितली जाते.
अनेक परकीय शासकानी येथील मंदिरावर आक्रमण केले व अनेक वेळा हे मंदिर उद्ध्वस्त केले.
आत्ता इथे असलेले हे मंदिर पुण्यश्लोक राणी अहिल्याबाई होळकर यांनी जिर्णोद्धार करून पुन्हा बांधलेले आहे. राजा रणजितसिंग यांनी मुख्य शिखरावर सोन्याचा मुलामा चढविला होता. परंतु तो मुसलमानांनी लूटमार करून चोरून नेला.
या शहरात १६०० पेक्षा जास्त मंदिरे आहेत.त्यामुळे यास मंदिराचे शहर म्हणून सुद्धा ओळखले जाते.
कसे पोहचाल:
१) रस्ते मार्ग : वाराणसी हे शहर उत्तर प्रदेश तसेच भारतातील इतर शहरासोबत रस्तेमार्गाने चांगल्या प्रकारे जोडलेले आहे. तसेच येथे जाण्यासाठी राज्य परिवहन मंडळाच्या बस नियमित उपलब्ध असतात.
२) रेल्वेमार्ग : वाराणसी हे रेल्वे स्थानक भारतातील एक प्रमुख रेल्वे जंक्शन आहे. त्यामुळे ते इतर प्रमुख शहरासोबत चांगल्या प्रकारे जोडलेले आहे.
३) हवाइमार्ग : वाराणसी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ आहे. जे भारत तसेच इतर देशातील प्रमुख शहरासोबत जोडलेले आहे.
१०) त्र्यंबकेश्वर (महाराष्ट्र):
राजा झंझ (शिलाहार वंश) याने गोदावरी ते भीमा दरम्यानच्या बारा नद्यांच्या उगमस्थळी भगवान महादेवाची एकूण बारा मंदिरे बांधली होती. त्यांतील हे एक आहे. हे मंदिर बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे.(12 jyotirling)
सध्याचे मंदिर हे थोरले बाजीराव पेशवे यांचे पुत्र पेशवे बाळाजी बाजीराव यांनी जुन्या मंदिराच्या जागेवर बांधले आहे. मंदिराच्या चारही बाजूस दगडाची तटबंदी असून, मंदिराला एकूण पाच सुवर्णकलश असून एक ध्वजा आहे जी पंचधातूंची बनवलेली आहे.
निसर्गरम्य परिसरात वसलेले हे मंदिर असल्याने तेथे बाराही महिने भाविक मोठी गर्दी करतात.तर श्रावण महिन्यात ही गर्दी अधिकच वाढत जाते.
कसे पोहचाल:
१) रस्ते मार्ग : त्रयंबकेश्वर हे शहर महाराष्ट्रातील इतर शहरासोबत रस्तेमार्गाने चांगल्या प्रकारे जोडलेले आहे. तसेच येथे जाण्यासाठी राज्य परिवहन मंडळाच्या बस नियमित उपलब्ध असतात.
२) रेल्वेमार्ग : जवळचे रेल्वे स्टेशन नाशिकरोड आहे जे साधारण 40 किमी अंतरावर आहे. त्यामुळे ते इतर प्रमुख शहरासोबत चांगल्या प्रकारे जोडलेले आहे.
३) हवाइमार्ग : नाशिक येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ आहे. जे भारत तसेच इतर देशातील प्रमुख शहरासोबत जोडलेले आहे.
११)केदारनाथ (उत्तराखंड):
भारतातील १२ जोतिर्लिंगा पेकी एक म्हणजे केदारनाथ होय. हे भारतातील उत्तराखंड राज्यातील रुद्रप्रयाग, गढ़वाल या ठिकाणी आहे.(12 jyotirling)
हिंदू धर्मातील ते एक प्रमुख व महत्त्वाचे तीर्थक्षेत्र मानले जाते.केदारनाथ हे मंदाकिनी नदीच्या काठावर वसले असून समुद्रसपाटी पासून ३५८३ मीटर उंचीवर आहे.
येथील मुख्य आकर्षण म्हणजे केदारनाथ मंदिर आहे, हे भगवान शिवाला समर्पित प्राचीन दगडी मंदिर आहे. मंदिराची वास्तुकला उत्कृष्ट आहे आणि भारतीय मंदिराच्या रचनेचा समृद्ध वारसा प्रतिबिंबित करते.(12 jyotirling)
धार्मिक महत्त्वाव्यतिरिक्त, केदारनाथ त्याच्या चित्तथरारक नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. हा प्रदेश केदार पर्वतरांगांसह हिमालयातील बर्फाच्छादित अविस्मरणीय दृश्ये देतो. हे मंदाकिनी नदीचे घर देखील आहे, जे निसर्गरम्य आकर्षण आणखी वाढवते.
कसे पोहचाल:
१)रस्ते मार्ग: रस्त्याने केदारनाथला जाण्यासाठी, तुम्ही दिल्लीहून ऋषिकेश (२३८ किमी, ५-६ तास) बस किंवा कारने जाऊ शकता.
गौरीकुंडला गेल्यावर केदारनाथ मंदिरापर्यंत जाण्यासाठी तुम्हाला 16 किमीचा पायी प्रवास करावा लागेल.
२)रेल्वे मार्ग: सर्वात जवळील रेल्वे स्टेशन ऋषिकेश रेल्वे स्टेशन असून ते गौरीकुंड पासून अंदाजे २१० कि. मी अंतरावर आहे. ऋषिकेश वरुन गौरिकूड ला जाण्यासाठी प्रायवेट कॅब किवा बसचा तुम्ही वापर करू शकता.
ऋषिकेश रेल्वे स्टेशन भारतातील जवळजवळ सर्व प्रमुख शहरांशी चांगले जोडलेले आहे आणि दररोज नियमित गाड्या चालवतात.
३)हवाई मार्ग: सर्वात जवळील विमानतळ जॉली ग्रांट विमानतळ, २४८ कि.मी अंतरावर आहे, येथून गौरीकुंड साठी प्रायवेट कॅब उपलब्ध असतात. देहरादून हे दिल्लीसारख्या प्रमुख शहरांमधून देशांतर्गत उड्डाणांनी चांगले जोडलेले आहे.
१२)घृष्णेश्वर (महाराष्ट्र):
हे एक प्राचीन शिवालय असून ते १२ ज्योतिर्लिंगा पैकी एक आहे.हे ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात असून दौलताबाद या शहरापासून सुमारे ११ कि.मी. अंतरावर तर वेरूळ लेण्यांजवळ हे मंदिर आहे.
हिंदूचे प्राचीन ग्रंथ जसे कि शिवपुराण, स्कंदपुराण, रामायण, महाभारत या ग्रंथांतसुद्धा या ठिकाणाचे उल्लेख आढळतो.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांनी प्रथमतः या मंदिराचा १६ व्या शतकात जीर्णोद्धार केला तर सध्याचे अस्तित्वात असलेले हे मंदिर मल्हारराव होळकरांच्या पत्नी गौतमीबाईंनी बांधलेले असून नंतर पुण्यश्लोक राणी अहिल्याबाई होळकरांनी पुनः एकदा या मंदिराचा जीर्णोद्धार केला.(12 jyotirling)
कसे पोहचाल:
१) रस्ते मार्ग : घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग हे मंदिर छत्रपती संभाजीनगर शहरापासून ३१ कि. मी अंतरावर आहे तसेच ते महाराष्ट्रातील इतर शहरासोबत रस्तेमार्गाने चांगल्या प्रकारे जोडलेले आहे. येथे जाण्यासाठी राज्य परिवहन मंडळाच्या बस नियमित उपलब्ध असतात.
२) रेल्वेमार्ग : सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन हे छत्रपती संभाजीनगर आहे जे ३६ कि. मी अंतरावर आहे. त्यामुळे ते इतर प्रमुख शहरासोबत चांगल्या प्रकारे जोडलेले आहे.
३) हवाइमार्ग : सर्वात जवळचे विमानतळ हे छत्रपती संभाजीनगर विमानतळ आहे.