नवरात्री
अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षात येणारा हा नवरात्रीचा उत्सव म्हणजे दुर्गा मातेची उपासना करण्याचा सण होय. नवरात्र ही वेगवेगळ्या कारणांसाठी आणि विविध हिंदू सांस्कृतिक क्षेत्रांच्या विविध भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते.नवरात्र या शब्दाचा शब्दशः अर्थ नऊ रात्रींचा समूह असा होत असून हा सण नऊ रात्री (आणि दहा दिवस) साजरा होतो. हे नऊ दिवस म्हणजे आश्विन शुद्ध प्रतिपदा ते आश्विन शुद्ध नवमीपर्यंत होय.
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते. नवरात्री मध्ये देव्हाऱ्यात अखंड नंदादीप लावला जातो. देवीचे नवरात्र बसविल्यावर या देवीवर किंवा घटावर फुलाने पाणी शिंपडून अभिषेक व पूजा केली जाते.
त्यांच्या पुण्यप्रकोपातून एक दैवी शक्ति निर्माण झाली. सर्व देवांनी जयजयकार करून तिचे पूजन केले, व तिला स्वत:च्या दिव्य आयुधांनी मंडित केले. ह्या दिव्ययशक्तीने नऊ दिवस अविरत युद करुन महिषासुराला मारले. आसुरी वृतीला संपवून, दैवी शक्तीची पुनःस्थापना करून देवांना अभय दिले. ही शक्ती देवता म्हणजेच आपली जगदंबा होय.नवरात्रीच्या नऊच्या नऊ दिवस अखंड दीप तेवत ठेवून आई जगदंबेची पूजा करून तिच्या पासून शक्ति प्राप्त करून घेण्याचे दिवस म्हणजे हे नवरात्रीचे नऊ दिवस होत.
नवरात्रीचे नऊ दिवस हे दुर्गा देवीच्या नऊ अवताराना (नवदुर्गाना) समर्पित असून
दिवस दुसरा : नवरात्रीचा दुसरा दिवस हा पार्वतीचा आणखी एक अवतार असलेल्या ब्रह्मचारिणीला समर्पित असून या रूपामध्ये माता पार्वती योगिनी बनली होती.ही देवी आनंद आणि शांततेचे प्रतीक असून, शांती आणि समृद्धीसाठी पूजा केली जाते.
दिवस तिसरा: नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटाच्या पूजेचे स्मरण केले जाते माता पार्वती ने भगवान शिवाशी विवाह केल्यानंतर स्वत:चे कपाळ अर्धचंद्राने सजवले होते. ती शौर्याचे प्रतीक आहे.
दिवस चौथा: नवरात्रीच्या चौथ्या दिवशी विश्वाची सर्जनशील शक्ती मानली जाणारी कुष्मांडा देवीची पूजा केली जाते.
दिवस पाचवा: पाचव्या दिवशी कार्तिकेय ची माता स्कंदमाता ची पूजा केली जाते.
दिवस सहावा: योद्धा देवी म्हणून ओळखली जाणारी कात्यायनी देवीची नवरात्रीच्या सहाव्या दिवशी पूजा केली जाते.ती पार्वती, महालक्ष्मी, महासरस्वती यांचे रूप असून सर्वात हिंसक तिला मानले जाते.
दिवस सातवा: दुर्गा देवीचे सर्वात उग्र रूप मानली जाणारी कालरात्रीचे सातव्या दिवशी पूजली जाते.
दिवस आठवा: आठव्या दिवशी बुद्धिमत्ता आणि शांतीचे प्रतीक असलेल्या महागौरीचे पूजन केले जाते.
दिवस नववा: नवव्या दिवशी अर्धनारीश्वर या नावाने ओळखले जाणाऱ्या सिद्धिदात्री ची पूजा केली जाते. दिक शास्त्रानुसार या देवीची उपासना करून भगवान शिवाने सर्व सिद्धी प्राप्त केल्या असे मानले जाते.
प्रथमं शैलपुत्रीति, द्वितीयं ब्रह्मचारिणी ।
तृतीयं चन्द्रघण्टेति, कूष्मांडीति चतुर्थकम् ।।
पंचमं स्कंदमातेति षष्ठं कात्यायनीतिच ।
सप्तमं कालरात्रिश्च महागौरीतिचाष्टमम् ।।
नवमं सिद्धिदां प्रोक्ता नवदुर्गाः प्रकीर्तिताः ।
उक्तान्येतानि नामानि, ब्रह्मणैव महात्मना ।।
नवरात्रीचे नऊ रंग २०२३
१) दिवस पहिला नारंगी रंग: नारंगी हा रंग सकारात्मक उर्जेने भरलेला असून व्यक्तीचे मन उत्साही ठेवतो. हा रंग परिधान केल्याने ऊर्जा व आनंदाची सहानभूती मिळते.
२) दिवस दुसरा पांढरा रंग : शुद्धता आणि साधेपणाचे प्रतीक असणारा हा रंग सुरक्षिततेची भावना देतो.
३) दिवस तिसरा लाल रंग : लाल रंग हा उत्साह आणि प्रेमाचे प्रतीक असून, हा रंग भक्तांमध्ये शक्ती आणि चैतन्य निर्माण करतो.
४) दिवस चौथा निळा रंग : शांततेचा प्रतीक असणारा निळा रंग सागर आणि आकाशाची अमर्यादा खोली यांची अनुभूती देतो.
५) दिवस पाचवा पिवळा रंग : उबदारपणाचे प्रतीक असणार हा रंग व्यक्तीला आनंदी व आशावादी ठेवतो
६) दिवस सहावा हिरवा रंग : हिरवा रंग हा रंग निसर्गाचा, निर्मितीचा, आरोग्याचा आणि सकारात्मक ऊर्जेचा आहे असं म्हटलं जातं. या रंगामुळे शांतता आणि स्थिरतेची भावना निर्माण करतो.
७ ) दिवस सातवा राखाडी रंग: राखाडी रंग हा बुद्धिमत्तेचं प्रतीक असून हा अतिशय हरहुन्नरी रंग आहे.
८) दिवस आठवा जांभळा रंग : सुख-समृद्धी चे प्रतीक असणारा हा रंग भव्यता आणि राजेशाही दर्शवतो.हा रंग कल्पनाशक्ती आणि विकेंद्रीपणाचे प्रतीक आहे.
९) दिवस नववा मोरपंखी रंग : विशिष्टता दर्शवनारा हा रंग सुख समृद्धी, सुसंवाद आणि आपुलकी दर्शवितो.